Mehboob Shaikh & Shadab Sayyed
Mehboob Shaikh & Shadab SayyedSarkarnama

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धुसफुस, प्रदेश सरचिटणीसांनी सोडला पक्ष

NCP Nashik; NCP Sharad Chandra Pawar party state general secretary Shadab Syed resigns-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नियुक्त्यांमध्ये अन्याय, प्रदेश सरचिटणीस शादाब सय्यद यांचा राजीनामा?
Published on

NCP Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पदाधिकाऱ्यांमधील धुसफूस वाढली आहे. पक्षामध्ये नव्या नियुक्त्या करताना अन्याय होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे काही पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांना प्रदेश सरचिटणीस शादाब सय्यद यांनी आपला राजीनामा पाठविला आहे. लवकरच ते शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रदेश सरचिटणीस शादाब सय्यद यांनी पक्षाच्या आजवरच्या कामकाजात शरदचंद्र पवार यांच्या निर्देशानुसार काम केले. पक्षाच्या वाढीसाठी विविध आंदोलने करून राज्य सरकार विरोधात वातावरण निर्मिती केली. मात्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची योग्य दखल न घेता उपेक्षा केल्याची तक्रार केली आहे.

Mehboob Shaikh & Shadab Sayyed
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांनी कृषिमंत्री कोकाटेंच्या वर्मावरच ठेवले बोट, म्हणाले, सतत घर बदलणाऱ्यांना...

पक्षात सध्या शहर अध्यक्ष बाळा निगळ यांनी वारंवार पाठपुरावा करू नये शहराची कार्यकारिणी जाहीर केलेली नाही. जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या नियुक्ती पुरषोत्तम कडलग यांच्या सोयीने केल्या जातात. पक्षांमध्ये काही पदाधिकाऱ्यांचा वाढता हस्तक्षेप आणि दबाव यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांना काम करताना अडचणी येतात, अशी तक्रार सय्यद यांनी केली आहे.

Mehboob Shaikh & Shadab Sayyed
Gulabrao Patil : पक्षात घेतलेले जळगावचे लोकही तपासा, हगवणे प्रकरणानंतर गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना सल्ला

या संदर्भात पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांना भेटून विनंती केली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याने अल्पसंख्यांक आणि दलित मतदार दूर जाण्याची शक्यता आहे. पक्षाने तातडीने उपाययोजना करून त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे सय्यद यांनी सांगितले.

सय्यद यांनी आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाप्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांना दिला आहे. मालेगाव शहराचे प्रभारी म्हणून देखील ते काम करीत होते. मालेगाव आणि शहरातील अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांना न्याय देता येत नसल्याने राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या पदाधिकाऱ्यांमध्ये दुरावा वाढत चालल्याचा दावा केला जातो. नसल्याने पक्षाचे संघटनात्मक स्तरावरील कामकाज व सामान्य जनतेच्या प्रश्नावर होणारे आंदोलन असे कोणतेही उपक्रम होत नाहीत. पक्षाचा जनमानसातील प्रभाव टिकविण्यासाठी तातडीने वरिष्ठांनी लक्ष घालून नाशिकच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात याव्यात असेही या पत्रात म्हटले आहे

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com