Gulabrao Patil : पक्षात घेतलेले जळगावचे लोकही तपासा, हगवणे प्रकरणानंतर गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना सल्ला

Gulabrao Patil's Reaction to the Hagavne Case, Advice to Ajit Pawar : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुण्याच्या वैशाली हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावरुन गुलाबराव पाटील यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.
Gulabrao Patil & Chhagan Bhujbal
Gulabrao Patil & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुण्याच्या वैशाली हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावरुन गुलाबराव पाटील यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. जळगावमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले, हगवणे सारखा नालायक व्यक्ती पक्षात नको असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. केवळ हगवणे नाही तर पक्षात घेतलेली सर्व लोक तपासा असा सल्ला गुलाबरावांनी अजित पवारांना दिला आहे. जळगावातले जे लोक अजित दादांनी पक्षात घेतले त्यांनाही तपासलं पाहिजे असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत जळगावातील अनेक बड्या नेत्यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. गुलाबराव पाटील यांचा या नेत्यांच्या प्रवेशाला विरोध असतानाही अजित पवार यांनी त्यांना पक्षात घेतलं म्हणून गुलाबराव पाटील नाराज होते. विशेष: गुलाबराव देवकर यांना पक्षात घेतल्याने पाटील नाराज होते. त्या पार्श्वभूमीवर गुलाबरावांनी केलेल्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे. गुलाबरावांचा रोख देवकर यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.

Gulabrao Patil & Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांनी कृषिमंत्री कोकाटेंच्या वर्मावरच ठेवले बोट, म्हणाले, सतत घर बदलणाऱ्यांना...

ते पुढे म्हणाले, पुण्याच्या वैशाली हगवणे हुंडाबळी प्रकरणात कारवाई करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात असून या प्रकरणात दोषींना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, जे कोणी अन्याय अत्याचार करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. जळगावातले जे लोक अजित दादांनी पक्षात घेतले त्यांचीही अशीच प्रकरणं बाहेर येतील. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातीलही जे लोक अजितदादांनी पक्षात घेतले त्यांनाही तपासलं पाहिजे असा चिमटा त्यांनी नाव न घेता माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना लगावला.

Gulabrao Patil & Chhagan Bhujbal
Arjun Khotkar Politics: धुळे रोकड प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर यांचे कानावर हात, म्हणाले, ‘हा तर बदनामीचा डाव’

यावेळी धुळे विश्रामगृहातील कोट्यवधी रुपयांच्या प्रकरणावरुनही मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. धुळे येथील शासकीय विश्रामगृहात कोट्यावधी रुपये आमदारांसाठी आणल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे, मात्र या प्रकरणात तपास केला जाणार असून तपासात निष्पन्न होईल ते जनतेच्या समोर येईल असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com