NCP Nashik News : नाशिकच्या राष्ट्रवादी भवन कार्यालयाचा कब्जा घेत अजितदादा पवार यांच्या गटाने प्रतिस्पर्धी पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढवल्या होत्या. पक्षाचे सर्व आमदार व छगन भुजबळ यांच्यासह अजितदादा पवार गटात गेले तरी, शरद पवार यांच्या समर्थकांचा जोष मात्र अजिबात कमी झालेला नाही. (Flag hoisted on independence day at Nashik NCP Office of Sharad Pawar group)
मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (शरद पवार गटाच्या) नाशिक शहर- जिल्हा शाखेच्या वतीने मुंबई नाका येथे ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे या कार्यक्रमाला उत्साही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
या कार्यक्रमाची पार्श्वभूमी म्हणजे शेजारीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी भवन आहे. ते शरद पवार यांच्याशी संबंधीत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या मालकीचे आहे. मात्र छगन भुजबळ समर्थकांनी पोलीस बंदोबस्त व कार्यकर्ते घुसवून त्याचा ताबा घेतल्याचा शरद पवार समर्थकांचा आरोप आहे. त्याबाबत श्री. पवार यांनी देखील टिका केली होती. तेव्हापासून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना तेथे प्रवेश दिला जात नाही. या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्या पुढाकाराने शेजारीच एका खाजगी जागेत एका रात्रीत कार्यालय उभारले. तीथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेतला. त्यामुळे तो चर्चेचा ठरला.
याप्रसंगी शहर- जिल्हा अध्यक्ष शेलार यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. ग्रामीणचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, गोकुळ पिंगळे, लक्षमण मंडाले, प्रदेश उपाध्यक्ष राहुल शेलार, बाळासाहेब निगळ, शादाब सय्यद, वसंत ठाकरे, दत्तात्रेय माळोदे, महिला अध्यक्षा अनिताताई दामले यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.