NCP Politics : अजित पवार गटाला धक्का, नितीन मोहितेंचा ‘वंचित’ मध्ये प्रवेश

NCP Politics, Nitin Mohite joins Vanchit Bahujan Aghadi-नितीन मोहिते यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.
Nitin Mohite with Adv. Prakash Ambedkar
Nitin Mohite with Adv. Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Nashik NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नितीन मोहिते यांनी समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला हा राजकीय धक्का आहे. (Political shock for NCP Ajit Pawar Group in Nashik)

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज मुंबई (Mumbai) येथे हा प्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार (Ajit Pawar) गटाला सोडून त्यांनी हा प्रवेश केला. हा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला मोठा धक्का असल्याचा दावा त्यांनी केला.

Nitin Mohite with Adv. Prakash Ambedkar
Ajit Pawar News : पीएच. डी. करून काय दिवा लावणार?

आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून विस्तारासाठी काम सुरू आहे. त्यासाठी विविध पक्षांतून इनकमिंग सुरू आहे. यादृष्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या परंपरागत राजकीय पक्षांच्या काठावरच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवर नेत्यांचे लक्ष आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पवन पवार, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड, महानगर प्रमुख अविनाश शिंदे, महानगर सचिव बजरंग शिंदें यांसह विविध पदाधिकारी उपस्थितीत होते, अशी माहिती आघाडीचे शहर अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिली.

नितीन मोहिते हे राष्ट्रवादीचे नेते होते. त्यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी केली होती. देवळाली मतदारसंघासह शहर तसेच जिल्ह्यात त्यांचा संपर्क आहे. त्यांनी आपल्या समर्थकांसह प्रवेशाने वंचित बहुजन आघाडीला मोठे बळ मिळेल, असेही शिंदे यांनी सांगितले.

भाजपाला पर्याय म्हणून अनेक जण वंचित बहुजन आघाडीकडे अपेक्षेने बघत आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी निश्चितच करिष्मा करेल. त्यासाठी जिल्ह्यात संपर्क मोहीम सुरू आहे. लवकरच अन्य काही मोठे नेते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करतील, असा दावा त्यांनी केला.

Nitin Mohite with Adv. Prakash Ambedkar
Sanjay Raut : "नेहरू, गांधींवर टीका; मग मोदी त्यापेक्षा वेगळे आहेत का" ?...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com