Nashik Crime: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याची हत्या गुन्हेगारीच्या वर्चस्वातून... खंडणीचाही अँगल!

NCP Politics;NCP leader's murder: Extortion angle also in the context of criminal dominance debate-परिसरात वर्चस्व कोणाचे यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेता जाधव आणि गुन्हेगारांची सुरू होता वाद.
NCP leader Umesh Jadhav, Prashant Jadhav Murder case
NCP leader Umesh Jadhav, Prashant Jadhav Murder caseSarkarnama
Published on
Updated on

Nashik Police News: रंगपंचमीच्या दिवशी स्थानिक गुंडांच्या हल्ल्यात दोघा भावांची हत्या झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या शहर उपाध्यक्षाचाही समावेश होता. पोलिसांनी या प्रकरणात अतिशय वेगाने कारवाई करीत गुन्ह्याचा तपास केला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांची काल बजरंग वाडी येथे हत्या झाली होती. यामध्ये प्रतिस्पर्धी गटाकडून त्यांच्यावर चॉपर आणि धारधार शस्त्राने हल्ल्या करण्यात आला. या हत्येने परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता.

NCP leader Umesh Jadhav, Prashant Jadhav Murder case
Kalpana Chumbhale Politics: पदभार स्वीकारताच सभापती कल्पना चुंबळे यांनी सुरू केली पिंगळे यांची नाकाबंदी?

या संदर्भात पोलीस आयुक्तांनी दखल घेत सबंध यंत्रणा सक्रिय केली होती. पोलिसांनी याबाबत रात्रभर गुन्हेगारांचा शोध घेतला होता. सकाळी संबंधित आरोपी संभाजीनगर रोड वरील डाळिंब मार्केटमध्ये येणार असल्याचे पोलिसांना कळले. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, मिलिंदसिंग परदेशी, विशाल काठे, नसीम खान पठाण, विशाल देवरे, मुख्तार शेख आदींनी या मार्केटमध्ये जाऊन आरोपींना ताब्यात घेतले.

NCP leader Umesh Jadhav, Prashant Jadhav Murder case
Devadas Pingle Politics: बाजार समिती संचालकांची ‘पेट्यां’तून ‘खोक्यां’त उडी! २०० कोटी मागितल्याचा माजी सभापतींचा आरोप

या खून प्रकरणात सागर गरड, अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, योगेश रोकडे, अविनाश उर्फ सोनू उशीरे यांना अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपी देखील त्याच भागात राहतात. रंगपंचमी खेळून आल्यानंतर त्यांनी दबा धरून हा खून केला. गुन्हेगारीच्या स्थानिक वर्चस्वातून त्यांनी हा हल्ला केला होता. यापूर्वी राष्ट्रवादीचा नेता उमेश उर्फ मन्ना जाधव याने ५० हजार रुपये खंडणी मागितल्याचा गुन्हा आरोपींनीच त्याच्याविरुद्ध दाखल केला होता.

आरोपींपैकी सागर गरड याच्याविरुद्ध गांजा विक्रीचा गुन्हा दाखल आहे. खून झालेले जाधव यांच्या विरोधातही काही तक्रारी आहेत. स्थानिक परिसरात वर्चस्व कोणाचे यावरून त्यांच्या गेले काही दिवस वाद सुरू होते. या वादातूनच ही हत्या झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या हत्तीला गुन्हेगारीचा अँगल मिळाला आहे.

याबाबत पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास अतिशय वेगाने करीत अवघ्या सहा तासात आरोपींना अटक केली. यामध्ये पोलिसांनी आपल्या लोकल नेटवर्कचा उपयोग केला. या हत्येमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. गेल्या दोन महिन्यात शहराच्या विविध भागात खुनाचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर या तपासाने पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com