Sharad Pawar News : दुर्दैवाने आयातीला प्रोत्साहन देणारे सरकार; शरद पवारांचा हल्लाबोल

Sharad Pawar Nashik News : आपण सर्वजण शेती करणारे लोक असलो तरी आज ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे, शरद पवार यांची टीका
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama

Nashik News : आपण सर्वजण शेती करणारे लोक असलो तरी आज ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे, असा हल्लाबोल नाशिकमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला.

नाशिक (Nashik) येथील देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी आदिवासी आश्रमशाळा इमारत व मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार बोलत होते. पवार म्हणाले, नाशिक जिल्हा राज्यात उत्तम शेती करणारा जिल्हा असून या भागातून देशपातळीवर कांदा, द्राक्ष, डाळींब, टॉमॅटो पाठवले जातात. या सगळ्याच्या मागे सरकार उभे राहिले आणि मदत केली. तर माझी खात्री आहे की केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाची गरज आपण भागवू आणि देशाच्या बाहेर शेतमाल पाठवू. दुर्दैवाने ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांचे धोरण निर्यातीला नाही तर आयातीला प्रोत्साहन देणारे आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

Sharad Pawar News
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून याआधीही दोन-तीन वेळा बंडाचा प्रयत्न : शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट !

हे धोरण बदलावे म्हणून शेतकरी हिताच्या विरुद्ध धोरण आखणारे जे राज्यकर्ते असतील त्यांना बाजूला करण्याचे काम आपल्याला करावे लागेल. तुमच्या विकासकामांचा प्रश्न असतो तेव्हा सत्ता हाती नसली तरीही विविध मार्गांनी आपले प्रश्न सोडवून घ्यायचे तंत्र आम्हाला माहिती आहे. त्याचा वापर करून, तुम्हाला साथ देऊन, तुमचे जीवन कसे बदलेल यादृष्टीने काळजी घेऊ, असे पवार म्हणाले.

नाशिक हा राज्यातील उत्तम शेती करणारा जिल्हा आहे. फळबाग, भाजीपाला व अन्य गोष्टींमध्ये नाशिक जिल्हा पुढे आहे. इथे साखर कारखानदारी झाली. दुर्दैवाने इथला नाशिक सहकारी साखर कारखाना बंद पडला. हा कारखाना सुरु करण्याचे प्रयत्न करताना सरोजताई जेव्हा माझ्याकडे आल्या तेव्हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कारखान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. नाशिक सहकारी साखर कारखाना लवकरच सुरु होईल, असा विश्वास मला आहे. यातून ज्या शेतकऱ्यांनी ऊसाचे पीक घेतले असेल त्यांना दोन पैसे अधिकचे मिळतील, असेही पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar News
Ajit Pawar News : गौतम अदानींसोबतच्या फोटोवरून ट्रोल होताच अजित पवार संतापले; म्हणाले...

आदिवासींसाठी चांगली आश्रमशाळा, चांगले वसतीगृह, वीजेची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय हवी. सरोजताईंनी महाराष्ट्र सरकारकडून त्यासाठी लागणारी रक्कम मंजूर करून आणली आणि आज सर्वांच्या उपस्थितीत या सर्व कामांचे भूमिपूजन आपण केले. माझी खात्री आहे की येत्या दोन वर्षांत या गोष्टी उभ्या राहून आदिवासी मुला-मुलींना एक चांगली सुविधा मिळेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com