Dindori Lok Sabha : भारती पवारांना धक्का देण्यासाठी आता शरद पवार दिंडोरीत काय गुगली टाकणार?

Sharad Pawar : शरद पवार यांनी दिंडोरीच्या रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.
Sharad Pawar and Dr. Bharati Pawar
Sharad Pawar and Dr. Bharati Pawar Sarkarnama
Published on
Updated on

अरविंद जाधव

Nashik News : सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर कब्जा मिळवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत (शरद पवार गट) थेट रस्सीखेच सुरू असणार आहे. पहिल्याच टर्ममध्ये थेट केंद्रीय राज्यमंत्रिपद घेणाऱ्या भारती पवार यांच्यासमोर उमेदवार देताना शरद पवार काय गुगली टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मोदी गॅरंटीबाबत भाजपचा आक्रमक प्रचार आणि कांदा निर्यातबंदी अशा दोनच बाबींवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा प्रचार केंद्रभूत राहण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर लागलीच शरद पवारांनी दिंडोरी गाठून रस्त्यावर उतरून आंदोलन केले. हा मतदारसंघ शेतकरीबहुल आहे. कांदा, द्राक्ष आणि भाजीपाल्याचे येथे उत्पादन होते. त्यातच मराठा आरक्षणाचा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा राहणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar and Dr. Bharati Pawar
Chhagan Bhujbal Vs Kunal Darade : भुजबळांसमोर कुणाल दराडेंचे तगडे आव्हान

कांदा निर्यातबंदीमुळे भाजप (BJP) गोत्यात येण्याची चिन्हे ओळखून शरद पवारांनी आपले लक्ष दिंडोरीकडे वळवले आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार हे अजित पवार गटात गेलेले आहेत. त्यामुळे शरद पवार नेमकी काय खेळी करतात, कोणाला रिंगणात उतरवतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

दिंडोरी मतदारसंघातील येवला, दिंडोरी-पेठ, कळवण-सुरगाणा, निफाड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात होते. मात्र, या मतदारसंघाच्या आमदारांनी अजित पवार गटाची वाट धरली आहे. नांदगावात शिंदे गटाचे आमदार असून चांदवड व देवळा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे.

या मतदारसंघातून शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून दिंडोरीचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांच्या नावाची चर्चा आहे. भास्कर गावित, रामदास चारोस्कर, सुनीता चारोस्कर हे ठाकरे गटात असून त्यांच्या नावांची चर्चा आहे, तर काँग्रेसचे रमेश कहांडोळे इच्छुक आहेत.

गत निवडणुकीत उमेदवारी कापण्यात आलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाणदेखील इच्छुक आहेत. मात्र ते भाजपात आहेत. आघाडी म्हणून तगडा उमेदवार उतरवला जाण्याची शक्यता असल्याने, शरद पवार ऐनवेळी राजकीय खेळी करून कोणत्या उमेदवारास पुढे आणतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Sharad Pawar and Dr. Bharati Pawar
Shivsena politics : गीतेंच्या मिसळ पार्टीचा आमदार फरांदेंना ठसका? ठाकरेंचा नाशिक दौरा ठरणार महत्त्वपूर्ण!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com