Shivsena politics : गीतेंच्या मिसळ पार्टीचा आमदार फरांदेंना ठसका? ठाकरेंचा नाशिक दौरा ठरणार महत्त्वपूर्ण!

Shivsena Vs BJP politics : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार वसंत गीते यांची कार्यकर्त्यांसाठी मिसळपार्टी.
devyani pharande-Vasant Geete
devyani pharande-Vasant Geete Sarkarnama
Published on
Updated on

Uddav Thackrey Nashik Tour News : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत येत्या २२ जानेवारीला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिवेशन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते, माजी आमदार वसंत गीते यांनी नाशिककरांसाठी मिसळपार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीची चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे. (Vasant Geete's candidature will be announced during Uddhav Thackeray Nashik's Tour)

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २२ जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याची जोरदार तयारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक विभागात बैठकांचा धडाका सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने 23 जानेवारीला होणारी ठाकरे यांची सभा यशस्वी होईल, असा दावा करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

devyani pharande-Vasant Geete
Nashik Political : ठाकरेंची शिवसेना करणार प्राणप्रतिष्ठा सोहळा 'हायजॅक'

उद्धव ठाकरे यांचा दौरा पूर्णतः आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग आहे. या माध्यमातून ते भाजपकडून येत्या २२ तारखेला अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या राजकीय इव्हेंटला उत्तर देणार आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांचीही राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे. गीते यांची मिसळपार्टी त्याचाच एक भाग मानला जातो.

devyani pharande-Vasant Geete
Kolhapur Politics : कोल्हापुरात सहकाराच्या नावावर सगळंच खपतंय; मुश्रीफांची महाआघाडीच्या नेत्यांशी मैत्री कायम!

माजी आमदार गीते यांच्या मिसळपार्टीसाठी जोरदार तयारी सुरू असून महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही या पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये नाशिक शहरात निवडणूक तयारीचा भाग म्हणून मिसळपार्टी आयोजिण्याचा प्रघात पडलेला आहे. त्यामुळे या मिसळपार्टीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक मध्य मतदारसंघातून गीते यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्ष घोषणा म्हणून पाहिले जात आहे.

नाशिक मध्य या मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे विद्यमान आमदार आहेत. आमदार फरांदे आणि माजी आमदार गीते यांच्यातील राजकीय सख्य जगजाहीर आहे. हे दोघेही विधानसभा निवडणुकीसाठी प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत.

devyani pharande-Vasant Geete
Solapur NCP : सोलापूर दौऱ्यापूर्वीच अजितदादांचा शरद पवारांना धक्का; प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादीत होणार प्रवेश

यंदाच्या निवडणुकीत गीते हे देवयानी फरांदे यांना मोठे आव्हान निर्माण करू शकतात. सामाजिकदृष्ट्या गीते स्थानिक, तसेच तळागाळातील जनतेशी व कार्यकर्त्यांचा मोठा संपर्क असलेले नेते आहेत. त्यामुळे नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या आमदार फरांदे आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार गीते यांच्यातील राजकारणाला निवडणुकीपूर्वीच या मिसळपार्टीच्यानिमित्ताने जोरदार तडका मिळणार आहे. त्यामुळे या पार्टीची चर्चा शहराच्या राजकारणात सुरू झाली आहे.

Edited By : Vijay Dudhale

R...

devyani pharande-Vasant Geete
Farmers News : ‘शेतकऱ्यांनो, या नालायक सरकारला अजिबात सोडू नका, बदला घेण्याची वेळ आलीय...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com