Crops Insurance Politics : पीक विमा अग्रीमवरून बीडमध्ये श्रेयवाद ठिणगी..; शेतकरी मात्र मदतीच्या प्रतिक्षेतच

Beed farmers News : ऑगस्टमध्ये अचानक पावसाने ओढ घेतल्यामुळे लावलेली पिकेही जळून जात आहेत.
Crops Insurance Politics :
Crops Insurance Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Beed Polilitical News : यंदाच्या हंगामात वरुणराजा बीड जिल्ह्यावर चांगलाच नाराज असल्याचे दिसत आहे. जुन-जुलै महिन्यात झालेल्या थोड्या-फार पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लावणीसाठी लगबग सुरू केली. पण ऑगस्टमध्ये अचानक पावसाने ओढ घेतल्यामुळे लावलेली पिकेही जळून जात आहेत. एकीकडे पावसाचा सलग खंड पडला आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात मात्र पीकविम्यावरुन राजकारण रंगलं आहे.

पीक विमा 25 % अग्रीम मंजुरीवरून जिल्ह्यात राजकीय श्रेयवादाचा मुसळधार पडत आहेत. सगळेच नेते आमच्यामुळेच 'अमुक' महसूल मंडळाचा पीक विमा अग्रीम मंजुरीच्या यादीत समावेश झाला, असा दावा करत आहेत. पण हवालदिल शेतकरी मात्र आपल्या झोळीत पीक विमा अग्रीमची रक्कम कधी पडणार, याची वाट बघत आहे. (Beed Political News)

Crops Insurance Politics :
MLA Disqualification News : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत मोठी अपडेट ; पुढील आठवड्यापासून सुनावणी, पुरावे सादर करा..

यंदा सुरुवातीपासूनच पावसाने आवकृपा दाखवली. खरीप हंगामात पहिल्या टप्प्यात पेरलेल्या सोयाबीन पिकावर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर थोडा बहुत पाऊस झाला. पण ऑगस्टपासून वरुणराजाने चांगलीच उघडीप घेतली. त्यामुळे खरीप हंगामात जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेल्या सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग, बाजरी पिके अक्षरशः करपून गेली. (Crop Insurance)

कुठे 21 दिवस तर कुठे तब्बल महिनाभर पावसाचा खंड झाला. दरम्यान, महसूल, विमा कंपनीच्या संयुक्त पीक पाहणीचा अहवाल प्रधानमंत्री पीक विमा जिल्हास्तरीय संयुक्त समितीमध्ये ठेवला. यात समितीच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी 86 पैकी 52 मंडळातील सोयाबीन पिकाला तसेच 13 मंडळातील मूग आणि 22 मंडळातील उडीद पिकाला 25% पीक विमा अग्रीम मंजूर केला.

Crops Insurance Politics :
Chandrababu Naidu Arrested : मोठी बातमी : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

या आदेशानंतर श्रेय आणि नाराजी एकदमच उफाळून आली. त्यानंतर पुन्हा काही मंडळ यात समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर पुन्हा श्रेयवादाचा पाऊस सुरु झाला. दरम्यान, पुन्हा शुक्रवारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली आणि सर्वच मंडळातील सोयाबीन पीक विमा अग्रीम मिळण्यासाठी पात्र ठरले. (NCP- BJP Politics)

त्यानंतर श्रेयवादाचा पाऊस मुसळधार जोरदार बरसत आहे. आता जिल्ह्यातील एकमेकांचे विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप राज्यात सत्तेत एकत्र असल्याने दोन्ही पक्षांचे नेते आमच्यामुळेच विमा अग्रीम मंजूर झाल्याचे सांगत आहेत. आता मात्र जिल्हाधिकाऱ्यांची पीक विमा अग्रीम मंजुरीची अधिसूचना पीक विमा कंपनी मान्य करते का, आणि शेतकऱ्यांची ओटी अग्रीम रकमेने भरते का, हे पाहणे महत्वाचे आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com