Rohit Pawar Meghana Bordikar : आमदार पवारांनी भाजपची 'दुखती नस' दाबली; मंत्री बोर्डीकर संतापल्याचं कारण वेगळं सांगत कोंडी केली

Rohit Pawar Criticizes BJP Minister Meghana Bordikar Over Empty Event in Parbhani : भाजप मंत्री मेघना बोर्डीकर का संतापल्या यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.
Rohit Pawar Meghana Bordikar
Rohit Pawar Meghana BordikarSarkarnama
Published on
Updated on

Parbhani BJP event controversy : भाजप महायुती सरकारमधील मंत्र्यांमध्ये वादग्रस्त विधानांची स्पर्धाच सुरू आहे. भाजप आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना समाज माध्यमांवर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली.

मंत्री बोर्डीकर यांनी यावर घाईघाईनं खुलासा केला. परंतु यावरून देखील आमदार पवार यांनी भाजपसह मंत्री बोर्डीकर यांना डिवचलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, "कार्यक्रमाला कमी लोक आले म्हणून मंत्री रागावल्या, हे समजण्यासारखं आहे. पण त्यासाठी कानाखाली मारण्याची भाषा करणे योग्य नाही". हे केवळ त्या अधिकाऱ्यांचा नव्हे, तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा अपमान आहे, असा टोला आमदार पवारांनी भाजप महायुती सरकारला लगावला.

'अधिकाऱ्यांनी जर चूक केली असेल, तर कारवाई नक्कीच होऊ शकते. पण लोकांसमोर अशा प्रकारची धमकी देणे, हा मंत्रिमंडळाचा देखील अपमान आहे', असे सांगून आमदार रोहित पवार यांनी भाजप (BJP) मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Rohit Pawar Meghana Bordikar
Vishwajeet Kadam Vishal Patil friendship : महायुतीचा चक्रव्यूह अन् 'मविआ'चा रोष; तावून-सुलाखून निघालेले 'विश्वविशाल' मैत्री!

भाजप परभणीच्या पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री मेघाना बोर्डीकर यांच्या उपस्थित जिंत्तूरच्या बोरी इथं पंतप्रधान आवास योजनेचा कार्यक्रम झाला. या सरकारी कार्यक्रमाला गर्दी नव्हती. त्यामुळे मंत्री बोर्डीकर संतापल्याचा दावा रोहित पवार यांनी करत डिवचलं आहे. 'घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात?', असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला होता.

Rohit Pawar Meghana Bordikar
RSS BJP Congress political clash : 'संघाचा विचार फुटीरतावादी'; श्यामाप्रसाद मुखर्जींच्या उपमुख्यमंत्रीपदाचा हर्षवर्धन सपकाळांनी 'इतिहास'च काढला

मेघना बोर्डीकर यांचे स्पष्टीकरण

'रोहित पवार यांनी अर्धवट माहितीच्या आधारे राज्यातील जनतेची दिशाभूल केली. बोरी इथल्या विधवा, मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी ग्रामसेवक छळ करतो, त्यांच्याकडे पैशांची मागणी करतो, अशा तक्रारी होत्या. महिला माझ्याकडे येऊन रडत होत्या. त्यातून माझा त्रागा झाला. मी जे बोलले, ते माझ्या लाडक्या बहि‍णींसाठी बोलले', असे मंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटले.

काय म्हणाल्या मंत्री बोर्डीकर

"असं कुणाचं काम केलं ना, तर याद राख, हे मेघना बोर्डीकरचे शब्द आहेत. कानाखाली मारीन, पगार कोण देते, आताच्या आता बडतर्फ करेल. चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद रख तू, काय कारभार करतो, हे मला माहित नाही का? मी मुद्दामून सीईओ मॅडमला इथं घेऊन आले आहे, हमाली करायची ना, तर सोडून दे नोकरी", असे मंत्री बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्याला म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com