Rohit Pawar Politics : रोहित पवारांचे 'पॉवर पॉलिटिक्स'; गाठीभेटींचा टायमिंग साधत 'भक्कम पेरणी'

NCP SharadChandra Pawar Party MLA Rohit Pawar CM Devendra Fadnavis Legislative Council President Ram Shinde Nagpur : नागपूर विधिमंडळाच्या अधिवेशन काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे विरोधकांच्या गाठीभेटींनी चर्चेत आले आहे.
Rohit Pawar 1
Rohit Pawar 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याच्या राजकारणात काहीसे स्थिरावलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नागपूर विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात विरोधक नेत्यांच्या घेतलेल्या गाठीभेटींमुळे चर्चेत आले.

त्यांच्या या गाठीभेटी म्हणजे रोहित पवार यांचे राज्याच्या राजकारणात अधिक भक्कमपणे स्थिरावण्याचे 'पॉवर पॉलिटिक्स' असल्याची चर्चा रंगली आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनेतील खांदेपालटावर, त्यात जयंत पाटील आणि रोहित पवार यांचे राजकीय स्थान असेल, यावर सर्वाधिक चर्चा रंगल्यात.

रोहित पवार यांना राज्याच्या राजकारणात सर्वाधिक रस आहे. त्यांची ही राजकीय इच्छा लपून राहिलेली नाही. महाविकास आघाडी (MVA) सरकारपासून ते राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. राज्यासह देशाच्या मुद्यांवर ते सत्ताधाऱ्यांशी संघर्ष, आवाज उठवताना दिसतात. तशी रोहित पवार यांची आमदारकीची ही दुसरी टर्म. कर्जत-जामखेडमध्ये त्यांचा राजकीय संघर्ष विधानपरिषदेच्या सभापतीपदी विराजमान झालेले प्रा. राम शिंदे यांच्याशी, अर्थात थेट भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे.

Rohit Pawar 1
Top 10 News : भाजप खासदारांनी दिलं प्रियांका गांधींना खास ‘गिफ्ट ; आव्हाडांना नेमकं काय म्हणायचंय! - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

विरोधात असताना, सत्ताधाऱ्यांना अंगावर घेणे तसे सोपे नाही. त्याची किंमत देखील चुकवावी लागते. तशी रोहित पवार यांना देखील किंमत चुकवावी लागली. मध्यतंरी त्यांच्या 'ईडी'ची कारवाई झाली. त्यांच्या कंपनीची मालमत्ता 'ईडी'ने कारवाई जप्त झालेली आहे. यातून सावरत रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांशी राजकीय संघर्ष सुरूच ठेवला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचा नातू अशी ओळख जरी असली, तरी त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतःशी ओळख निर्माण करण्यासाठी घेत असलेले मेहनत स्वकीय विरोधकांसह सत्ताधाऱ्यांच्या नजरेतून सुटलेली नाही.

Rohit Pawar 1
Santosh Deshmukh Murder Case : भावाच्या अंगावर 56 घाव; CM फडणवीसांचे विधानसभेत उत्तर, मयत देशमुखांच्या भावाची 'मोठी' प्रतिक्रिया

नागपूर विधिमंडळ हिवाळी अधिवेशन बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने, परभणी येथील संविधानाच्या अपमानाने, त्यातच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यूने तसेच मुंबईतील कल्याण मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याने गाजत आहे. महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा शपथविधीनंतर खाते वाटप देखील लांबले आहे. यातच रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या गाठीभेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यांच्या घेतल्या भेटी...

भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार, मंत्री शिवेद्रराजे भोसले, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री जयकुमार गोरे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे, आमदार डाॅ. परिणय फुके यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेतली.

ही चर्चा रंगलीय...

रोहित पवार यांच्या या गाठीभेटी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांच्या नजरेतून सुटल्या नसून, त्यामागे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण सुरू झाले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा परफॉर्मन्स जेमतेम राहिला. यामुळे सध्या पक्ष संघटनेत बदलाचे वारे वाहू लागले आहेत. यातून रोहित पवार आणि सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. रोहित पवार यांनी मध्यंतरी पक्ष संघटनेतील नेतृत्वावर स्पष्ट समतोल राखणारे भाष्य केले होते. त्यातून त्यांनी आज विधिमंडळात सत्ताधारी नेत्यांच्या घेतलेल्या भेटीचा संदर्भ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील संघटनेवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे रोहित पवार यांच्या या गाठीभेटी चर्चेत आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com