Santosh Deshmukh Murder Case : भावाच्या अंगावर 56 घाव; CM फडणवीसांचे विधानसभेत उत्तर, मयत देशमुखांच्या भावाची 'मोठी' प्रतिक्रिया

Santosh Deshmukh CM Devendra Fadnavis assembly Beed Massajog Village sarpanch : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तरावर मयताचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.
Santosh Deshmukh Murder
Santosh Deshmukh Murder Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या कारवाईचे संकेत दिले. या हत्येत वाल्मिक कराड याचा संबंध आढळल्या, मग कोणीही आडवा आला, तरी सोडणार नाही, असे सांगून हत्येची न्यायालयीन आणि विशेष पथकामार्फत चौकशी होईल.

तसेच संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करतानाच, पोलिस (Police) अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यावर मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला उद्या 13 दिवस पूर्ण होत आहे. 'माझा भाऊ मयत संतोष देशमुख यांच्या अंगावर 56 घाव होते. त्यामुळे उद्या सायंकाळपर्यंत हत्येतील सर्व आरोपींना अटक करा. मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. बीड जिल्ह्यात अराजकता माजलेली आहे. ती मोडून काढली पाहिजे. हे सर्व प्रकार कुठेतरी थांबले पाहिजे', अशी अपेक्षा धनंजय देशमुख यांनी केली.

Santosh Deshmukh Murder
Supriya Sule : 'मुख्यमंत्र्यांच्या शहरात महिलेला मारहाण, मराठी कुटुंबावर हल्ला'; खासदार सुळेंच्या फडणवीसांकडून मोठ्या अपेक्षा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात तीन ते सहा महिन्यात संपूर्ण तपास केला जाईल, यावर धनंजय देशमुख यांनी हा कालावधी जास्त होत आहे. 'या घटनेत जेवढ्या वेगाने तपास करता येईल, तेवढा करावा. तसेच सरकारकडे मोठी तपास यंत्रणा आहेत. ती सर्व यंत्रणा कार्यरत करावी. आरोपी सोडू नका', अशीही मागणी धनंजय देशमुख यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशमुख यांच्या हत्येची चौकशी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत नेमलेल्या विशेष पथकाकडून होईल, असे सांगितले.

Santosh Deshmukh Murder
Sanjay Raut : 'कल्याणमध्ये मराठी माणसाची हत्याच होणार होती'; खासदार राऊतांचा CM फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

बीडमध्ये गुन्हेगारी पराकोटीची...

"तपासात कोणताच कसूर ठेवू नका. संघटीत गुन्हेगारी मोठ्या गुन्ह्याला बळ देते. कारवाई झाल्यास संघटीत गुन्हेगारीला आळा बसेल. बीड जिल्ह्यात अराजकता माजलेली आहे. मदत करायची असेल, तर भावाच्या हत्येतील आरोपींना सर्वात अगोदर जेरबंद करा. त्यांना शिक्षा करावी", असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडमधील सर्व गुन्हेगारी मोडून काढू, असे देखील आश्वासन दिले आहे.

सीएम फडणवीसांवर संपूर्ण विश्वास...

तसेच मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की, पाच मिनिटाच्या आत मी पोलिस ठाण्यात पोचलो होतो. तिथं पोलिस अधिकारी कुठे आहेत, हे शोधत होते. ते तिथं नव्हते. पण कोठे आहेत, हे मला देखील माहीत नव्हतं. पण मुख्यमंत्री फडणवीससाहेबांनी सभागृहात सांगितल्यावर कळाले. फडणवीसांनी खूप विचारपूर्वक ही गोष्टीची मांडणी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता माझा पूर्ण विश्वास आहे की, माझ्या भावाला, त्याच्या कुटुंबियाला आणि देशमुख परिवाराला न्याय मिळेल.

भाऊ संतोषच्या अंगावर 56 ठिकाणी घाव

मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून दहा लाख रुपयांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केली. यावर धनंजय देशमुख म्हणाले, कोणत्याही प्रकाराच्या मदतीवर मला बोलायचे नाही. परंतु आमच्या कुटुंबियांना मदत करायची असेल, तर भावाच्या गुन्हेगारांना अटक करण्यासाठी मदत करा. माझ्या भावाच्या अंगावर 56 ठिकाणी घाव आहेत. काय वेदना झाल्या असतील, तो आता आमच्या नाहीत. त्याचा खून झाला आहे. याकडे धनंजय देशमुख यांनी लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com