भाजप प्रदेशाध्यक्षांच्या पोस्टरला चपलांचा मार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे धुळ्यात आंदोलन
NCP womens agitation at Dhule
NCP womens agitation at DhuleSarkarnama
Published on
Updated on

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बेताल वक्तव्य केल्याने येथील (Dhule) राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या पोस्टरला चपलांचा मार देत निषेध आंदोलन केले. महापालिकेच्या प्रवेशव्दारात चपला मारो आंदोलन झाले. (NCP protest against BJP leader Chandrakant Patil)

NCP womens agitation at Dhule
संजय काळे यांच्या प्रवेशाने शिवसेनेचा भाजपला जोर का झटका!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व युवती आघाडीतर्फे झालेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहराध्यक्षा सरोज कदम, युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हिमानी वाघ, संजीवनी पाटील, तरुणा पाटील, उषा पाटील, ज्योती चौधरी, सुषमा महाले, सुरेखा नांद्रे, शोभा पाटील, मंजू परदेशी आदी सहभागी झाले. कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचे, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे चंद्रकांत पाटील हे सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलले होते. त्यांच्या वक्तव्याने महिलांचा अपमान झाल्याचे बोलले जात आहे.

NCP womens agitation at Dhule
आनंदवल्ली भागातून शिवसेनेचा आमदार पाठवा

या पार्श्वभूमीवर संताप व्यक्त करत आणि त्यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ येथे आंदोलन झाले. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

त्या म्हणाल्या, श्री. पाटील चर्चेत राहण्यासाठी सातत्याने वादग्रस्त विधाने करतात. त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार केव्हीह पडेल, आज पडेल, उद्या पडेल असे सातत्याने सांगून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रय्तन केला. प्रत्यक्षात त्यांनी सांगितलेले काहीही घडले नाही. उत्तर कोल्हापूर मतदारसंघात भाजप जिंकला नाही तर हिमालयात जाईल असे ते म्हणाले. प्रत्यक्षात भाजपचा दारूण पारभव झाला. मात्र हिमालयात जाण्यास तयार नाहीत. त्यांनी हिमालयात जाण्याची गरज आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com