सातपूर : शिवसेना (Shivsena) जनतेचे व शहराचे प्रश्न सोडविण्यास सदैव सज्ज असते. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून नाशिक (Nashik) शहरात विकासाची नवी कामे उभी राहतील. त्यामुळे पुढच्या निवडणूकीत गंगापूर भागातून शिवसेनेचाच आमदार निवडून जाईल, असा दावा शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केला. (Shivsena is prepared for nashik devolopment)
गंगापूर रोडवरील सुमारे ४४ कोटींच्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, देशात बेरोजगारी वाढली आहे. मोदी सरकारचे दोन कोटी नोकरी देण्याचे आश्वासन हवेत विरल्यानंतर आता रोजगार देण्याची नवीन घोषणा केली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे व वाढती महागाईकडे लक्ष विचलित करीत भोग्यांचा धार्मिक प्रश्नन उपस्थित करून देशात दंगली पेटविण्याचे कारस्थान रचले जात आहे. अशा या भाजप सरकारला घरी पाठविण्यासाठी शिवसेनेला बळ द्या.
ते पुढे म्हणाले, गंगापूर- आनंदवलीवासीयांनी शिवसेनेवर विश्वास ठेवून विलास शिंदे यांच्यासह चार नगरसेवक निवडून दिले. येणाऱ्या काळात याच भागातून शिवसेनेचा आमदार विधान सभेत पाठवा, असे आवाहन शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केले.
सातपूर विभागातील आनंदवली, गंगापूर रोड परिसरातील भोसला मिलटरी गेटसमोरील रस्ता काँक्रिटीकरणासह सुमारे ४४ कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन शिवसेना नेते सावंत यांच्या हस्ते झाले. संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, शिवसेना नेते जयंत दीडे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर,विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिदे, नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णूपंत बेडकुळे, मधुकर जाधव, नंदूशेठ जाधव आदी उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.