Jalgaon News : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दीक वाद आता रस्त्यावर आला आहे. एकनाथ खडसे यांचा आजार खोटा असल्याचे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्याचा शरद पवार गटाने निषेध केला असून, कार्यकर्त्यांनी मंत्री महाजन यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन केले.
जळगाव येथे आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस काळ फासून व जोडे मारून निषेध केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकनाथ खडसे यांनी दिलेले आव्हान महाजन यांनी स्वीकारावे असे अवाहन कार्यकर्त्यानी केले आहे. खडसे म्हटले आहे, की ''गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर झालेली शास्त्रक्रिया खोटी असेल, तर चौकशी करावी आणि सिद्ध झाल्यास भर चौकात जोडे मारावे आणि सिद्ध न झाल्यास महाजन यांनी जोडे खायची तयारी ठेवावी.'' असे आव्हान दिले आहे. तर यावेळी कार्यकर्त्यांनी ''नाथाभाऊ तुम आगे बढो.. हम तुमारे साथ है, गिरीश महाजन हाय हाय, मनोरुग्ण गिरीश महाजन यांचं करायचं काय खाली डोकं वरती पाय.'', अशा घोषणा दिल्या.
यावेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष् उमेश पाटिल, युवक महानगराध्यक्ष रिकु चौधरी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण,आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष् इब्राहिम तडवी सर, सामाजिक न्याय महानगराध्यक्ष रमेश बाऱ्हे, सुनील माळी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले होते. त्याला उत्तर देतांना महाजन म्हणाले, की ''खडसे हे आजाराचे सोंग करतात, त्यांना हृदयविकाराचा असा कोणता आजार झाला होता, त्यांना तातडीने मुंबईला जावे लागले. त्यांना गौण खनिज विभागाची १३८ कोटी रूपयांची नोटीस आल्यामुळे त्यांनी आजारी असल्याचे सांगून, ते मुंबईत एअरॲम्बुलन्सने दाखल झाले. तेथून आले आणि आमच्यावर खोटे आरोप करीत आहेत.''
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.