Gram Panchayat Result : गिरीश महाजन, गुलाबराव पाटील जोडीचे जळगावात निर्विवाद शतक!

Girish Mahajan & Gulabrao Patil wins more than 106 Gram Panchayat-जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ खडसेंसह विरोधकांचा धुव्वा उडाला!
Gulabrao Patil & Girish Mahajan
Gulabrao Patil & Girish MahajanSarkarnama

NJalgaon Gram Panchayat Politics : राजकीय आरोप, प्रत्यारोप आणि वर्चस्वासाठी सातत्याने राजकीय खडाखडी करणाऱ्या नेत्यांसाठी जळगाव प्रसिद्ध आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या कुस्तीत मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन या जोडीने दमदार शतक करीत विरोधकांना चारी मुंड्याा चीत केले आहे. (BJP & Eknath Shinde Group wins 106 Gram Panchayat in Jalgaon District)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीने बाजी मारली. भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) या जोडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांसह विरोधकांचा धुव्वा उडविला.

Gulabrao Patil & Girish Mahajan
NCP News : दम असेल तर...; ग्रामपंचायत निकालानंतर शरद पवार गटाचे सरकारला खुले आव्हान

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटप्रणीत महायुतीने सर्वाधिक जागा मिळवत झेंडा फडकविला आहे. यात भाजपला ५८ जागा मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी आपला प्रभाव कायम राखला आहे. आमदारांनी आपले गड शाबूत ठेवले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील १६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात १४ ग्रामपंचायतींतील उमेदवार बिनविरोध झाले. अन्य १५३ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. सोमवारी जाहीर झालेला निकाल हा विराेधकांसाठी धक्कादायक ठरला. यामध्ये महायुती सगळ्यात पुढे राहिली. शिवसेना शिंदे गट- ४८, शरद पवार गट- १८, ठाकरे गट- ११, अजित पवार गट- १७, काँग्रेस- चार व इतर- एक.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच भाजपचे नेते, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मदत पुनर्वसनमंत्री अनिल पाटील या मंत्र्यांनी लावलेली फिल्डिंग यशस्वी झाली. त्यांच्या गटाच्या बहुतांश आमदारांनी आपल्या मतदारसंघातील वर्चस्व कायम ठेवले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या या निकालात महायुतीला सर्वाधिक १२३ जागा मिळाल्या. भाजपने सर्वाधिक ५८ जागा मिळवल्या. शिवसेना शिंदे गटाला ४८ जागा मिळाल्या, असा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला. विरोधक शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाला मोजक्या जागा मिळाल्या आहेत. अपक्ष उमेदवारांनीदेखील आपले अस्तित्व दाखवले.

Gulabrao Patil & Girish Mahajan
Maratha Reservation Issue : छगन भुजबळांनी मंत्रिपदाचे संकेत मोडले?

जिल्ह्यात महायुती सरकारमधील तीन मंत्री आहेत. त्या मंत्र्यांनी आपली पत राखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यात ते यशस्वी झाल्याचे दिसून आले. विरोधकांना फारशा जागा मिळालेल्या नाहीत. महत्त्वाच्या गावांत महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हे निकाल चर्चेचा विषय ठरले आहेत.

मंत्र्यांचे वर्चस्व वाढले

ग्रामविकासमंत्री महाजन यांनी आपल्या मतदारसंघातील १७ पैकी १७ जागांवर विजय मिळविला. गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुक्यातील ३२ पैकी २७ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला. अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या अमळनेर मतदारसंघातील १४ पैकी सात ग्रामपंचायतींवर यश मिळविले आहे.

Gulabrao Patil & Girish Mahajan
Nashik Water issue : पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, तूर्त जायकवाडीला पाणी नकोच!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com