स्वबळावर गृहीत धरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे

पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता शिबिरातील सूर
Ex MLA ilip Wagh
Ex MLA ilip WaghSarkarnama
Published on
Updated on

पाचोरा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local self government Elections) निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सजग व्हावे. राज्य व जिल्हा पातळीचा आदेश आपल्याला बंधनकारक असला तरी आघाडी, युतीचा काय निर्णय व्हायचा तो होईल. सध्यातरी स्वबळावर लढायचे आहे, असे गृहित धरून प्रत्येकाने तयारीला लागा, पक्षाचा सर्वांगीण प्रभाव वाढवा आणि पक्षाचे संस्थापक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांचे हात बळकट करा, असा सूर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात उमटला.

Ex MLA ilip Wagh
मुका बाप कॅन्‍सरग्रस्‍त मुलासाठी अधिकाऱ्यासमोर हात जोडतो तेव्हा...

माजी आमदार दिलीप वाघ (Dilip Wagh) यांच्या अध्यक्षतेखाली महालपुरे मंगल कार्यालयात कार्यकर्ता शिबिर झाले. यावेळी पालिका गटनेते संजय वाघ, पंचायत समिती सदस्य ललित वाघ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, अशोक चौधरी, नितीन तावडे, विकास पाटील, अजहर खान, सतीश चौधरी, प्रा. भागवत महालपुरे, डॉ. पी. एन. पाटील, विजय पाटील आदी उपस्थित होते.

Ex MLA ilip Wagh
भाजपचा आजचा मोर्चा प्रचारला साजेशा होणार की?...

श्री. वाघ यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन सांगून, त्यांचा ‘सह्याद्रीचा वाघ’, असा उल्लेख केला. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून श्री. पवारांनी घेतलेले समाजोपयोगी निर्णय, कर्जमाफीचे धोरण, महिला आरक्षण, विद्यापीठ नामांतर, समाजातील सर्वच घटकांच्या हितासाठी घेतलेले निर्णय व त्यांची केलेली अंमलबजावणीसंदर्भात माहिती दिली.

विविध ठिकाणी निवड झालेले प्राचार्य आर. व्ही. पाटील, सरला पाटील, शालिक मालकर, सिद्धार्थ पवार, अरुण पाटील, राजू पाटील, वंदना चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. विकास पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. संजय वाघ यांनी आभार मानले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com