Ahmednagar Politics : खासदार लंके उखाण्यात कोणाचं नाव घेणार? पाटील 'एबी' फॉर्मवर सही करणार

Jayant Patil decided to give the candidate for Parner Assembly Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत मोठं भाष्य केलं.
Ahmednagar Politics 1
Ahmednagar Politics 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : महाविकास आघाडीत पारनेर विधानसभा मतदारसंघातील जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात रस्सीखेच सुरू आहे. यातच 'NCP' शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या जागेच्या अधिकारांबाबत, घोषणा केल्याचा दावा खासदार नीलेश लंके यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला.

पारनेर-नगर मतदारसंघाचा 'NCP' शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार खासदार नीलेश लंकेच ठरविणार आहेत. लंके यांनी नाव घ्यावे मी लगेच 'एबी' फॉर्मवर सही करतो, असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांच्या या भूमिकेमुळे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात खासदार लंकेंविरुद्ध शिवेसना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, असा राजकीय संघर्ष उफाळण्याची चिन्हं आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने राज्यात काढलेली शिवस्वराज्य यात्रा निघोज होती. या यात्रेचं सभेत रूपांतर झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारनेर-नगर विधानसभा उमेदवाराबाबत मोठं विधान केलं. खासदार अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, महेबूब शेख, माजी आमदार राहुल जगताप, राणी लंके, अर्जुन भालेकर, राहुल झावरे उपस्थित होते.

Ahmednagar Politics 1
Shankarrao Gadakh : 'मी उद्धवसाहेबांबरोबरच'; शंकरराव गडाखांचा निर्धार अन् विरोधकांना खणखणीत इशारा

जयंत पाटील म्हणाले, "पारनेर-नगर मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची ते आम्ही खासदार लंकेंवर सोडलं आहे. तुम्ही सर्वानुमते ठरवा कोणाला उमेदवारी द्यायची? खासदार लंके यांनी नाव घ्यावे. नुसते नाव नव्हे, तर ते उखाण्यात घ्यावे. शरद पवारांपुढे त्यांनी उखाण्यात नाव घेतल्यावर मी त्यांच्या 'एबी' फॉर्मवर लगेच सही करेल". जयंत पाटील (Jayant Patil) यांनी असं म्हणताच, पारनेर-नगर विधानसभेच्या उमेदवार खासदार लंके यांच्या पत्नी राणी लंके याच असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Ahmednagar Politics 1
Ahmednagar Politics : अजितदादांना नगरमधून मोठा धक्का; पवारसाहेबांच्या 'शिवस्वराज्य'ची एन्ट्री अन् मोठ्या नेत्यानं पद सोडलं

महायुतीच्या शिर्डीतील कार्यक्रमावर टीका

जयंत पाटील यांनी राज्य सरकारने शिर्डी इथं घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पाच ते सात कोटी रूपये खर्च केले. या कार्यक्रमाला महिलांना घेऊन जाण्यासाठी एसटी बसेसचा वापर करण्यात आला. शिक्षणासाठी एसटीने प्रवास करणारे विद्यार्थी रस्त्यावर ताटकळत उभे असल्याचे जिल्हाभर पहावयास मिळाले. सरकारच्या सत्तेच्या गैरवापराला पारावार राहिला नसून सरकार आपल्या दारी या कार्यक्रमासाठी महिना-महिनाभर दाखले रखडविण्यात आल्याचा आरोप केला. आतापर्यंत कधीही झाला नाही इतका खर्च या सरकारने जाहिरातींवर केल्याचाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.

आम्हाला 'फ्री हॅण्ड' द्यावा

"लोकसभा निवडणुकीत दुसऱ्याचं इंजेक्शन लागू पडले नसते. त्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. महाविकास आघाडीच्या काळात आम्हाला फार त्रास झाला आहे. आता आपले सरकार सत्तेवर येणार असून त्यावेळी आम्हाला 'फ्री हॅण्ड' द्यावा लागेल. निवडणुकीच्या काळात माझा अपघात घडवून आणण्याचाही प्रयत्न झाला. माझ्यात हिंमत होती म्हणून या निवडणुकीत मी यश मिळवू शकलो", असे खासदार नीलेश लंके यांनी म्हटलं. अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार एक लाखांच्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा दावा देखील लंकेंनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com