Shankarrao Gadakh : 'मी उद्धवसाहेबांबरोबरच'; शंकरराव गडाखांचा निर्धार अन् विरोधकांना खणखणीत इशारा

Ex-Minister Shankarrao Gadakh resolution should be met at Newasa : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यात निर्धार मेळावा घेत, पुढील राजकीय संघर्षाची दिशा निश्चित केली. 
Shankarrao Gadakh
Shankarrao GadakhSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार शंकराव गडाख यांनी महायुती सरकारवर टीका करत स्वाभिमानी महाविकास आघाडी सरकार राज्यात आणण्याचा निर्धार मेळावा नेवासात घेतला.

शिवसेनाप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करत, त्यांनीच मंत्रिपदावर संधी दिली. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच असून उद्धवसाहेबांबरोबरच राहणार आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील राज्यातील जनता महाविकास आघाडीलाच कौल मिळेल, असा विश्वास शंकराव गडाख यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नेवासा इथं निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्याला उत्स्फूर्त गर्दी होती. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी ही लोक इथं जमली असून आता राज्यात महाविकास आघाडी सरकार येणार, संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळणार, असा दावा शंकरराव गडाख यांनी यावेळी केला.

Shankarrao Gadakh
Vivek Kolhe : '3000 कोटींचा हिशोब द्या'; विवेक कोल्हेंचं चॅलेंज अजितदादांचा आमदार स्वीकारणार का?

शंकरराव गडाख यांनी यावेळी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडी सरकार घालवल्यानंतर राज्यात आलेल्या महायुती सरकारने महाविकास आघाडीमधील आमदारांची अडवणूक केली. सरकारने मंजूर केलेल्या कामांना, स्थगिती दिली. महायुती सरकारच्या कावेबाजपणाचा धांडोळाच यावेळी शंकरराव गडाख यांनी मांडला. परंतु आता आपलं जनतेचे महाविकास आघाडी सरकार येणार असून जनतेने आणि शेतकऱ्यांनी (Farmer) ठामपणे पाठीशी उभं राहावं, असं आवाहन शंकरराव गडाख यांनी यावेळी केलं. 

Shankarrao Gadakh
Jayant Patil : आमदार जगतापांना विखेंसारख्या पराभवाची भीती; जयंत पाटील म्हणाले, 'सत्तेत येताच, त्यांना नवा विषय...'

आत्तापेक्षा डबल कामं करणार

"महाविकास आघाडीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे मंत्रीपदाची संधी मिळाली. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असून जनतेने पुन्हा संधी दिल्यास आत्तापेक्षा डबल कामं करू. माझ्याबद्दल नेवासा तालुका मतदारसंघांमध्ये काहीजण विशेष करून विरोधक गैरसमज पसरविणाऱ्याचा धंदा करत आहेत. या विरोधकांपासून सावध राहा. महाविकास आघाडीच्या छताखाली सर्वजण एकत्र येत आहेत. यामुळेच विरोधकांच्या पोटात दुखायला लागते. त्यांना मोठेपण सहन होताना दिसत नाही. त्यामुळे आपलं सरकार बनवण्यासाठी पक्का निर्धार करा", असंही शंकरराव गडाख यांनी यावेळी म्हंटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com