Shetkari Sanghtana Agitation: प्रशासनाला सुबुद्धीसाठी शेतकरी संघटना करणार यज्ञयाग!

Shetkari Sanghtana Agitation: शेतकरी संघटनेचा इशारा...जिल्हा बँकेची वसुली थांबवा अन्यथा आंदोलनाची धार होणार तीव्र
Shetkari Sanghtana agitation
Shetkari Sanghtana agitationSarkarnama

Farmers Association News: शेतकरी संघर्ष संघटना व शेतकरी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली निफाड तहसील कार्यालयासमोर १३ दिवसांपासून जिल्हा बँकेने सुरू केलेल्या सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात धरणे आंदोलन सुरू आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलकांनी आता यज्ञयाग करण्याचा निर्णय घेतला आहे. (Shetkari Sanghtana agitation in Niphad against NDCC Bank)

Shetkari Sanghtana agitation
ZP News: कपिल सिब्बलही `त्या`चे जि.प. सदस्यत्व वाचवू शकले नाही!

सत्ताधारी पक्षातील (Maharashtra Government) एकही लोकप्रतिनिधी, मंत्री आंदोलनस्थळी फिरकले नाही. प्रशासनाकडून तत्काळ लेखी आश्‍वासन न मिळाल्यास बुधवारी (ता. ‌१९) रास्तारोको करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, (Chief Minister) उपमुख्यमंत्री, मंत्र्यांना प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी यज्ञयाग करण्याची घोषणा आंदोलकांनी केली.

जिल्हा बँकेच्या वसुलीविरोधात आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. या वेळी ॲड. केशव खैरे, भगवान बोराडे, साकोरे मिगचे विलास बोरस्ते आदींनी या वेळी मार्गदर्शन केले. आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अश्‍विनी मोगल, आम आदमी पार्टीचे जिल्हाप्रमुख उत्तम निरभवणे, सरपंच संघटनेचे जिल्हा संघटक देवेंद्र काजळे, निफाड तालुकाध्यक्ष अमोल जाधव आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

कांदा अनुदानासाठी अडसर

जिल्हा बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर सहकारी सोसायटीचे नाव लावले आहे. त्यामुळे कांदा अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. शासनाने जाहीर केलेले अनुदान जिल्हा बँक लाटत आहे. ही दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, असा आरोप वाझगाव (ता. देवळा) येथील शेतकऱ्याने केला आहे. मुलांचे लग्न बाकी आहे. त्यामुळे मी सोसायटीचे नाव लावलेला सातबारा उतारा देवळा तालुक्यात नाही, असेही त्यांनी उद्विग्नतेने सांगितले. (Latest Maharashtra News)

Shetkari Sanghtana agitation
Dhananjay Munde Not Reachable: मोठी बातमी! धनंजय मुंडे आहेत कुठे?

शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे, तुषार गांगुर्डे, विनायक घोलप, दत्तात्रय सुडके, हेमंत जाधव, बाळासाहेब ढोमसे, उमाकांत शिंदे, लक्ष्मण बर्वे, ज्ञानेश्‍वर शिंगाडे, एकनाथ चौधरी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com