Dhananjay Munde Not Reachable: राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जात आहे. राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मुंबईकडे रवाना झाल्याचेही सांगितले जात आहे . धनंजय मुंडे यांचे दोन्ही नंबरही संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. कालच ते संभाजीनगरलाही गेले होते. मात्र आता ते नॉट रिचेबल झाले आहेत. (Maharashtra Politics)
विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे धनंजय मुंडे देखील (Dhananjay Munde) मुंबईकडे निघाल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics) अशातच धनंजय मुंडे ( इतके तडकाफडकी मुंबईला रवाना का झाले, याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. धनंजय मुंडे यांचे दोन्ही नंबर बंद असल्याने या घडामोडींचे गूढही वाढत चालले आहे. हे सर्व घटनाक्रम पाहता येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar)यांच्या भाजपसोबत जाण्याच्या प्रयत्नांना त्यांच्या पक्षातील आमदारांच्या संमती सह्या मिळाल्याने वेग आला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित आमदारांची यादी योग्यवेळी राज्यपालांकडे सादर करण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.