मंत्री असाल ते घरी : नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना का फटकारले?

Neelam Gorhe : विधान परिषदेत विषयाशी संबंध नसताना बोलणाऱ्या गुलाबराव पाटील यांची कानउघडणी
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई : शिक्षणमंत्री (Education Minister) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिलेल्या उत्तरावरून समाधान न झाल्याने विधान परिषदेत विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले. यावेळी मध्येच टेबलावर हात मारून निवेदन करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची सभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी चांगलीच कानउघडणी केली. (Council chairman Neelam Gorhe reprimand Minister Gulabrao Patil)

Gulabrao Patil
Bhaskar Jadhav: भास्कर जाधव यांनी अडथळा आणणाऱ्या नितेश राणेंना खडसावले

विधानपरिषदेत आज शिक्षण विभागाच्या चर्चेत मंत्री दीपक केसरकर यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त करीत गदारोळ केला. या गदारोळात सभापती गोऱ्हे सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत असतानाच मंत्री गुलाबराव पाटील उभे राहिले व निवेदन करू लागले. त्यांच्या निवेदनाने गदारोळ अधिकच वाढला. त्यामुळे सभापतींनी त्यांना अक्षरशः खडसावले.

Gulabrao Patil
नमिता मुंदडा यांच्या प्रश्नात इंग्रजी शब्दांचाच भडीमार!

गदारोळ सुरु असताना मंत्री गुलाबराव पाटील अचानक उठले आणि निवेदन करू लागले. ते म्हणाले, सभापती महोदया, याठिकाणी एका प्रश्नावर शिक्षणमंत्री उत्तर देत होते. विरोधी पक्षनेते याठिकाणी असे बोलले की, एक मंत्री दादागिरी करीत होता. मी त्यावेळी मंत्रीमंडळातील सभासद त्यावेळी होतो. अनिल परब यांना विचारा ते मंत्री होते. ते चाळीस दिवसांचा पगार देऊ शकले नाही. अर्थखात्याला विचारल्याशिवाय पगार देऊ शकले नाही.

त्यांचे हे निवेदन सुरु असताना गदारोळ सुरुच होता. श्री. पाटील विषयाशी संबंधीत नसल्याने सभापती नीलमताई गोऱ्हे यांनी त्यांना थांबवले.

त्या म्हणाल्या, गुलाबराव आपण खाली बसा. इथे तुमचा काय संबंध आहे?. तुमच्या खात्याशी संबंध नसताना, मी मंत्री होतो. तीथे काय घडले, हे काय सांगत आहात. त्याचा इथे काही संबंध आहे काय?. हे तुमच्या खात्याशी संबंधीत नाही. आपल्याला परवानगी दिली आहे का?. तुम्ही ताबडतोब खाली बसा. ही पध्दत नाही. मी तुम्हाला ताकीद देते.

त्या म्हणाल्या, सन्माननीय दीपक केसरकर यांच्या विभागाशी संबंध आहे. अचानक तुम्ही मी कॅबीनेटमध्ये काय करत होते. याचा आत्ता विषय नाही आहे. हात आपटून वगैरे बोलताय, खाली बसा. ही बोलायची पद्धत नाही. त्यांनी संसदीय कामकाज मंत्र्याचे याकडे लक्ष वेधले. सभागृहाचे कामकाज करण्यासाठी ही पद्धत नाही. परवानगी न घेता बोलणे योग्य नाही.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.