Nashik MNS : 'फिजिक्सवाला' क्लासमधील राडा भोवला; नाशिक पोलिसांची मोठी अॅक्शन, मनसेच्या 5 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Case registered against 5 MNS office bearers Nashik : नाशिकमधील एका खाजगी कोचिंग क्लासमधील परप्रांतीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Nashik MNS, PhysicsWallah Nashik incident,
Nashik MNS, PhysicsWallah Nashik incidentSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक शहरातील एका खाजगी कोचिंग क्लासमधील परप्रांतीय शिक्षकाकडून स्थानिक मराठी विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो. परप्रांतीय शिक्षक मराठी विद्यार्थ्यांशी अरेरावी करतात व त्यांना हिंदी बोलण्यास भाग पाडतात असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता.

याप्रकरणी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत फिजिक्सवाला कोचिंग क्लासच्या व्यवस्थापनाला जाब विचारत त्यातील एका परप्रांतीय कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर क्लास व्यवस्थापनाने दिलेल्या तक्रारीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून त्यानंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मराठी भाषेचा अवमान करण्यात आल्याचा आरोप करत मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 'फिजिक्सवाला' कोचिंग क्लासमध्ये राडा घातला होता. मराठी भाषेला गावठी भाषा म्हणणाऱ्या परप्रांतीय कर्मचाऱ्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला होता. या प्रकरणी क्लासच्या मॅनेजरने दिलेल्या तक्रारीनुसार मनसेच्या पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik MNS, PhysicsWallah Nashik incident,
Eknath Khadse : ACB चा सापळा लावतो म्हणत पोलिसाला धमकी; गृहमंत्र्यांवरही आक्षेपार्ह विधान, खडसेंवर आता डायरेक्ट FIR दाखल

नाशिकमधील शरणपूर रोडवर असलेल्या फिजिक्सवाला कोचिंग क्लासमध्ये ही घटना घडली. हिंदीत बोलणाऱ्या शिक्षकाचा राजीनामा घेऊन त्याला क्लासमधून काढून टाका, अन्यथा क्लासची तोडफोड केली जाईल अशी धमकी दिल्याची तक्रार क्लास व्यवस्थापनाने सरकारवाडा पोलिस स्टेशनला केली.

मराठी विद्यार्थ्यांना त्रास मनविसेचे आरोप

तर, विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार खासगी क्लासमध्ये जवळपास सर्वच मराठी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संघटनेने केलेल्या आरोपावरून संबंधित शिकवणीमधील सर्व शिक्षक परप्रांतीय असून ते हिंदीत बोलतात व हिंदीमध्ये शिक्षणाचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीच कळत नाही व त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा दावा मनविसेने केला.

Nashik MNS, PhysicsWallah Nashik incident,
Chhagan Bhujbal : 'त्या' 62 एकर जागेचे करायचे काय? मंत्री छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

याबाबत क्लास चालविणाऱ्या व्यवस्थापनाला जाब विचारण्यात आला. खासगी कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांना परप्रांतीय शिक्षक अरेरावी करत होते. तसेच शिकवणीमध्ये स्थानिक शिक्षकांना प्राधान्य देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांवर हिंदीचे दडपण आणल्यास, आंदोलन करण्याचा इशारा मनविसेने दिला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष ललित वाघ, मनविसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमेश भोई व बाजीराव मते, उपजिल्हाध्यक्ष नितीन धानापुने, शहर संघटक अक्षय कोंबडे, शहर संघटक विभागाध्यक्ष रोहित उगावकर, मेघराज नवले आदी उपस्थित होते.

पाच जणांवर गुन्हा

या प्रकरणी फिजिक्सवाला कोचिंग क्लासच्या मॅनेजरने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार मारहाण, धमकी आणि गोंधळ घालण्याच्या आरोपाखाली मनसेच्या पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लासमधील सर्व परप्रांतीय शिक्षकांचे सात दिवसांच्या आत राजीनामे घ्यावेत आणि त्यांच्या जागी मराठी शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा क्लासची तोडफोड करून पुन्हा 'मनसे स्टाईल' आंदोलन केले जाईल, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिल्याचे मॅनेजरने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com