Woman Accused Snake Bite Claim : ‘सर्पदंश झाल्याचा दावा’; CCTV मध्ये सेफ्टी पिनने पायाला टोचताना दिसली महिला आरोपी?

Woman claimed snakebite in police custody: न्यायालयीन कोठडीत रवानगी होण्यापूर्वी महिला आरोपीने सर्पदंश झाल्याचे सांगितले; घाटी रुग्णालयातील तपासणीत सर्पदंश आढळला नसल्याचा पोलिसांचा दावा.
woman fakes snake bite in police custody
CCTV reveals fake snake bite claimSarkarnama
Published on
Updated on

Newasa woman accused snake bite : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी होण्याची शक्यता असताना पोलिस कोठडीतील एका महिला आरोपीने अचानक पायाला सर्पदंश झाल्याचा दावा केल्याने नेवासे पोलिसांची धावपळ उडाली. सर्पदंशाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तिला तातडीने नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक तपासणीनंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर सर्पदंश झाल्याचे आढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर लॉकअपमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता आरोपी स्वतःच्या पायाला सेफ्टी पिनने टोचताना दिसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

अहिल्या दत्तात्रेय मैराळ (वय 38, रा. गंगापूर) हिला बालविवाहाच्या प्रकरणात 18 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. तिच्याविरोधात नेवासे पोलिस ठाण्यात पोक्सो, बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हे (Crime) दाखल आहेत.

मैराळ हिची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने तिला न्यायालयीन कोठडीत पाठविले जाण्याची शक्यता होती. याचदरम्यान तिने लॉकअपमध्ये आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आपल्या पायाला सर्पदंश झाल्याचे तिने पोलिसांना (Police) सांगितले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तिला तातडीने नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढील तपासणीची आवश्यकता असल्याने तिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.

woman fakes snake bite in police custody
Ayodhya Non Vegetarian Feast : अयोध्येत मांसाहारी मेजवानीचा आरोप; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली, योगींचा सवाल, अजय राय म्हणाले ‘पुरावा दाखवा’

तपासणीत काय समोर आले?

घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली. या तपासणीत विषारी किंवा बिनविषारी सर्पदंश झाल्याचे आढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे महिलेने केलेल्या सर्पदंशाच्या दाव्याबाबत पोलिसांना संशय निर्माण झाला.

यानंतर पोलिसांनी लॉकअपमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये महिला आरोपी स्वतःच्या पायाला सेफ्टी पिनने टोचताना दिसून आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे सर्पदंश झाल्याचा दावा बनाव असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

woman fakes snake bite in police custody
Ambadas Danve : 'फडणवीस भाजपसाठी नागपूरचेही नेते नाहीत, शिंदे खड्डे मोजण्याच्या कामात'; अंबादास दानवेंचा राहुल गांधींच्या Gen-Z संवादावरून हल्लाबोल

पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

वैद्यकीय तपासणीनंतर घाटी रुग्णालयातून महिलेला पुन्हा नेवासे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर तिला पुन्हा पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. नेवासे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले की, लॉकअपमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित महिला स्वतःच सेफ्टी पिनने पायाला टोचताना दिसून आली.

तसेच वैद्यकीय अहवालात सर्पदंश झाल्याचे आढळले नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात महिलेने सर्पदंश झाल्याचा बनाव केल्याच्या आरोपावरून स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक दराडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com