Nashik TCS case : एकीकडे फरार निदा खान पोलिसांना सापडेना ; दुसरीकडे इम्तियाज जलील तिला भेटून आले, पाठीशी उभे राहण्याचा शब्दही दिला

Imtiaz Jaleel met Nida Khan : दरम्यान, जलील यांच्या निदा खान भेटीच्या दाव्यानंतर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून निदा केवळ पोलिसांच्या फाईलवरच फरार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Imtiaz Jaleel, Nida Khan
Imtiaz Jaleel, Nida KhanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News : नाशिक येथील बहुराष्ट्रीय TCS या आयटी कंपनीतील हिंदू महिलांवरील लैगिंक अत्याचार व धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. पोलिसांची पथके तिच्या मागावर असून आजूनही पोलिस तिला शोधू शकलेले नाही. असे असताना AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी तिला समर्थन दिले आहे. तसेच जलील यांनी आपण निदा खानची भेट घेतल्याचा दावा केला आहे. दरम्यान, जलील यांनी केलेल्या या भेटीच्या दाव्यानंतर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दरम्यान फरार संशयित आरोपी निदा खानने नाशिकरोड कोर्टात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे. तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (दि. २७) न सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आपला निकाल राखून ठेवला असून, तो 2 मे रोजी सुनावला जाणार आहे. त्यामुळे तिच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे. याप्रकरणात ज्या 8 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी निदा खान एक आहे.

दरम्यान, मुंबईमधील एका कार्यक्रमात बोलताना इम्तियाज जलील यांनी मोठा गौप्यस्फोट केला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी धक्कादायक दावा केला. मी निदा खान व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सर्व जग तुमच्याविरोधात गेलं तरी मी तुमच्या पाठिशी उभा राहिल असं आश्वासन मी तिच्या कुटुंबीयांना दिल्याचं जलील यांनी सांगितलं.

निदा ही कुणाची तरी मुलगी आहे. कुणाची तरी पत्नी आहे. कुणाची बहिण आहे. याचा कोणताही विचार न करता तिच्यावर नको नको ते आरोप करण्यात आले. कोणी तिची बाजू घेतली नाही. सगळे शांत बसले. पण, मी गेलो, तिला भेटलो. तिच्या तणावात असलेल्या आई-वडिलांना भेटलो. पोलिस येतील आणि आमच्या मुलीला कधीही घेऊन जातील या भीतीने त्यांना झोप नाही. अशा परिस्थितीत मी त्यांना वचन दिलं की, सगळं जग जरी निदाच्या विरोधात गेलं तरी तिच्या पाठीशी मी पूर्ण ताकदीनिशी उभा राहील असं जलील यांनी सांगितल.

नाशिक येथील टीसीएस कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण व धार्मिक भावना दुखावण्यासह धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणीनऊ गुन्ह्यात संशयित आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, दानिश शेख यांच्यासह कंपनीतील पुण्यातील एचआर हेड अश्विनी चैनानीला अटक केली आहे. संशयित प्रोसेस असोशिएट निदा खान पसार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com