Nilesh Lanke : कांदा महायुतीला पुन्हा रडवणार? खासदार लंके आक्रमक; महाविकास आघाडीचे 'वादळ' नगरमध्ये धडकणार

Nilesh Lanka will protest : खासदार निलेश लंके कांदा आणि दूध प्रश्नावर आक्रमक झाले असून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जाणार आहेत. या मोर्चात महाविकास आघाडीतील नेत्यांसह शेकडो शेतकरी सहभागी होण्याचा अंदाज आहे.
 Nilesh Lanka
Nilesh Lankasarkarnama

Nilesh Lanka News : निर्यातबंदीमुळे कांद्याचे कोसळलेले भाव तसेच दुधाच्या दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी शेतकरी जनआक्रोश आंदोलन होणार आहे. या आंदोलनाचा इशारा पूर्वीच नीलेश लंके यांनी दिला होता. परंतु आचारसंहितेमुळे त्यांना आंदोलन करता आले नाही.

शुक्रवारी सकाळी 10 वाजता या आंदोलनास सुरूवात होणार असून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला कांद्यामुळे फटका बसल्याची कबुली महायुतीचे नेते देत आहेत.

या आंदोलनासंदर्भा लंके Nilesh Lanka यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना निवेदन दिले. राज्यातील कांदा व दुध उत्पादक शेतकरी योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. दुधाचे भाव गेली वर्षभर सातत्याने कोसळत आहेत. सध्या दुधाला मिळणाऱ्या भावामध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही त्यातून निघत नसल्याने राज्यातील शेतकरी मेताकुटीला आला आहे. सरकारने दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली खरी परंतू अनुदानाच्या जाचक अटी व शर्तींमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ हेात नाही.

नुकतीच केंद्र सरकारने 10 हजार टन दुध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही आयात करमुक्त असल्यामुळे दुध उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. केंद्र आणि व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेती तोट्यात जाऊ लागली आहे.

वाढलेली महागाई, नैसर्गिक आपत्ती, खतांचे वाढलेले दर, सरकारचे शेतीमालासंदर्भातील चुकीचे धोरण, रासायनिक खते, बी-बियाणे, किटकनाशके, शेती औजारे यांच्या माध्यमातून जीएसटीचा शेतकऱ्यांवर बोजा पडलेला आहे. मात्र देशभरातील जनतेला अन्नधान्य पुरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर सरकारला दिसत नाही. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने संपूर्ण कर्जमाफीसह तात्काळ विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे.

राज्यातील शेतकऱ्यांमध्ये Farmar दुध आणि शेतीमालाच्या हमी भावावरूनप प्रचंड असंतोष आहे. यासाठी अनेक शेतकरी संघटना विविध आंदोलने करीत आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला 40 रूपये दर मिळावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, कांदा व इतर शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा या मागणीसाठी हजारो शेतकरी, दुध उत्पादक तसेच विविध शेतकरी संघटनांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com