Ahmednagar Politics : ही कोणती पद्धत, वसुबारसला शंभर बोकडांचे बळी ? आमदार लंकेंचा खासदार विखेंवर गंभीर आरोप

Ncp Mla Nilesh Lanke On Bjp MP Sujay Vikhe Patil : दिवाळी संपली, पण नगर जिल्ह्यात दिवाळी फराळावरून राजकारण तापले आहे...
Nilesh Lanke, Sujay vikhe patil
Nilesh Lanke, Sujay vikhe patilSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात आजी-माजी आमदारांचा दिवाळी फराळाचा कार्यक्रम चांगलाच गाजला. सुरुवातीला गोडधोड आणि त्यामागून उणीधुणी आता सुरू झाली आहेत. खासदार विखेंनी या फराळाच्या कार्यक्रमांवर सुरुवातीला टीका केली होती. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी त्यांच्या स्टाइलमध्ये या टीकेचा 'सरकारनामा'शी बोलताना समाचार घेतला आहे.

Nilesh Lanke, Sujay vikhe patil
Sangram Jagtap News : पोलिसांच्या विनंतीनंतर आमदार जगतापांचे उपोषण स्थगित, काय घडलं नेमकं?

आमदार नीलेश लंके म्हणाले, "आमदार हे लोकप्रतिनिधी असतात. दिवाळी हा सणच गोडधोडाचा कार्यक्रम असतो. दिवाळीनिमित्त शेजारी फराळाचे ताट देण्याची आपली संस्कृती आहे. मीदेखील एक लोकप्रतिनिधी आहे. माझ्या सुख-दुःखात माझ्या मतदारसंघातीलच जनता आहे. त्यांच्याबरोबरच दिवाळीचे गोडधोड खाणार, वाटणारच! यांना काय जाते आमदारांना हलवाई म्हणायला. यांनी दिवाळीच्या नावाखाली काय केले हे नगरच्या जनतेला माहीत आहे." महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बारस असते. त्या दिवशी जर हे शंभर बोकडे कापत असतील तर! म्हणजे बळीच घेतला यांनी! ही कोणती पद्धत आहे. संतांच्या भूमीला हे मान्य नाही. धर्मसंस्कार सांगताना एका बाजूने 'जय श्रीराम'चा नारा द्यायचा, अन् दुसऱ्या बाजूला धर्माची शिकवण द्यायची. असे कृत्य म्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक आहे, असेही आमदार लंके म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर शहरातील सीना नदीवरील पुलाच्या उद्घाटनात सहा दिवसांपूर्वी खासदार सुजय विखे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. आमदार नीलेश लंके यांच्याबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे विक्रम राठोड, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांना लक्ष्य केले होते. समाजात राहून टीका करण्यापेक्षा विकासकामांच्या मागे जनता उभी राहते. नुसते दिवाळी फराळाचे वाटप करून, माणूस मोठा होत असता, तर प्रत्येक आमदार हलवाई झाला असता, अशी टीका खासदार विखेंनी आमदार लंकेचे नाव न घेता केली होती.

खासदार विखेंच्या या टीकेनंतर नगर जिल्ह्यात चांगलाच गदारोळ झाला. किरण काळे आणि विक्रम राठोड यांनी सडेतोड उत्तर दिले. आता आमदार लंके यांनीदेखील खासदार विखेंवर टीकास्त्र सोडले आहे. आमदार लंके यांची ही टीका तिखट असल्याने त्यावर आगामी काळात पडसाद उमटणार, असे दिसते आहे.

Edited By Sachin Fulpagare

Nilesh Lanke, Sujay vikhe patil
Ram Shinde News : आमच्या नादाला लागल्यास मोडल्याशिवाय राहत नाही... ; आमदार शिंदेंचे वक्तव्य चर्चेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com