Nilesh Lanke And Sujay Vikhe : भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेल्या माझ्या प्रचारसभांचे व्हिडिओ गोळा करत आहेत. सुजय विखेंकडून होत असलेल्या व्हिडिओंची मागणी माझ्या कानावर आली आहे. खासदार नीलेश लंके यांनीच स्वतः ही माहिती दिली.
सुजय विखे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणीची मागणी केल्यानंतर एक-एक माहिती समोर येत आहे. सुजय विखे आणि नीलेश लंके यांच्यातील राजकीय संघर्ष 1991 च्या बाळासाहेब विखे आणि यशवंतराव गडाख यांच्या निवडणुकीच्या दिशेने चालला आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुती भाजपचे (BJP) सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांच्यात 'कांटे की टक्कर', अशी निवडणूक झाली. यात नीलेश लंके यांचा तब्बल 28 हजार मतांनी विजय झाला. यानंतर सर्व काही अलबेल असल्याचे भासत असतानाच सुजय विखे यांनी नगर दक्षिण मतदारसंघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणी मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती समोर आली.
याशिवाय नीलेश लंके यांच्या प्रचारसभा जिथे झाल्या आहेत, तिथे चित्रीकरणाची देखील माहिती मागवले आहे. तसे खासदार नीलेश लंके यांनीच सांगितले आहे. खासदार लंके यांनी त्यांच्या प्रचारसभांच्या चित्रीकरणाचा संदर्भ पुढे केला, तेव्हा बाळासाहेब विखे आणि यशवंतराव गडाख यांच्यात 1991 च्या निवडणुकीची देखील आठवण झाली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांनी 1991 च्या निवडणुकीत प्रचंड टोकाचा प्रचार केला होता. बाळासाहेब विखे यांनी या निवडणुकीच्या खटल्यात व्हिडिओचे पुरावे सादर केले होते.
बाळासाहेब विखे यांनी सादर केलेले व्हिडिओचे पुरावे खटल्यात महत्त्वपूर्ण भूमिका ठरले होते. या पुराव्यांमुळे शरद पवार (Sharad Pawar) देखील अडचणीत आले होते. खासदार नीलेश लंके यांनी दिलेल्या माहितीनुसार सुजय विखे व्हिडिओ गोळा करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक पुढे न्यायालयाच्या उंबरठ्यावर पुराव्यानिशी धडकणार, असे हे संकेत आहेत. नीलेश लंके यांना प्रचारादरम्यान सुजय विखेंकडून नोटीस बजावण्यात आली होती. काही तासांत विखेंनी त्यावर खुलासा मागितला होता. लंके यांनी देखील तो सादर केला होता. त्यामुळे ही निवडणूक निकालानंतर देखील सोपी नसल्याचे दिसते.
दरम्यान, खासदार नीलेश लंके यांनी दोन दिवसांपूर्वी विखेंबरोबर विकासासाठी सहमतीचे राजकारणाचे संकेत दिले होते. विखे कुटुंबावर सुस्तीसुमने उधळली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भेट घेऊन आशीर्वाद घेणार असल्याचे म्हटले होते. मात्र, सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केल्याने खासदार नीलेश लंके यांच्या विखेंबरोबरच्या सहमतीच्या राजकारणाला ब्रेक लावल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.