नीलेश लंके म्हणाले, `युवक राजकारणात आले तरच राजकारणाची सुधारणा`

वावी (सिन्नर) येथे आमदार नीलेश लंके आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे स्वागत करण्यात आले.
MLA Nilesh Lanke with Youth
MLA Nilesh Lanke with YouthSarkarnama
Published on
Updated on

सिन्नर : युवकांनी फक्त इतरांना नावे ठेवायचे व व्यवस्थेत दोष शोधायचे काम करूत बसू नये. तुम्हाला स्वतः राजकारणात सहभागी व्हावे लागेल. तर आपल्या गावाचा विकास करणे शक्य होईल, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke)यांनी युवकांना केले.

MLA Nilesh Lanke with Youth
भाजप समर्थक बंडखोरांमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अडचणीत?

योग्य मार्गदर्शन मिळाल्यास गावातील तरुणांकडून स्थानिक समस्यांचा निपटारा सहज शक्य आहे. सामाजिक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. असे झाले तरच गावाचा आणि परिसराचा विकास करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले. वावी (ता. सिन्नर) येथील तरुणांशी संवाद साधताना ते बोलत होते.

MLA Nilesh Lanke with Youth
भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन नाथाभाऊ खडसेंपुढे कच्चा लिंबू ठरले?

आमदार लंके नाशिकहून शिर्डीकडे जातांना वावी (सिन्नर) येथील तरुणांच्या आग्रहाखातर थांबले होते. पारनेरला उभारलेले जंबो कोविड सेंटर व जनमानसात सहज मिसळण्याच्या स्वभाव, काम करण्याची विशिष्ट पद्धत यामुळे श्री. लंके चर्चेत आहेत. त्यांचे केवळ नगर जिल्हा नाही तर राज्यातील गावागावात फॅन आहेत. याची प्रचिती वावी येथे आली.

रात्री आठ वाजता श्री. लंके येणार म्हणून बसस्थानक परिसरात तरुणवर्ग बहुसंख्येने थांबून होता. मात्र, वाटेत ठिकठिकाणी थांबावे लागल्याने त्यांना पोहोचायला मध्यरात्रीचे दीड वाजले. तरीदेखील तरुणांचा उत्साह मावळला नव्हता. गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याला आमदार श्री. लंके यांच्या हस्ते माल्यार्पण केल्यानंतर त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार श्री. लंके यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये तरुणांच्या सहभागाची गरज विशद केली. जबाबदारीचे भान ठेवून तरुणांनी आपले सामाजिक कर्तव्य निभावल्यास गाव आणि परिसराचा विकास व्हायला वेळ लागणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तरुणांचे मिळणारे पाठबळ हीच आपल्यासाठी काम करण्याची ऊर्जा असल्याचे ते म्हणाले.

ग्रामपंचायत सदस्य संदीप राजेभोसले, अक्षय खर्डे, गौरव वर्मा, दर्शन सोमाणी, सचिन देसाई, सचिन वेलजाळी, गोविंद कवाडे, संतोष घेगडमल, राहुल खांबेकर, अनिकेत पाचपाटील, किशोर कदम, राकेश आनप, अनिकेत काटे, संकेत ताजणे, प्रीतम खर्डे, दीपक सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com