Ajit Pawar Vs Nilesh Lanke : शरद पवारांना उद्देशून अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर नीलेश लंकेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Ahmednagar Constituency News : विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करावी, कोणत्या खासदाराचे काम असते डाळ आणि साखर वाटणे? सुजय विखेंना लगवला टोला!
Nilesh Lanke
Nilesh Lanke News Sarkarnama

'शरद पवारांना नीलेश लंके हा काळा की गोरा हे माहीत नव्हते. मीच त्याला पक्षात आणले. पारनेर मतदारसंघांमध्ये त्याला भरघोस निधी दिला आणि निष्ठा दाखवण्याची वेळ आल्यावर सोडून गेला.' या अजित पवारांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार नीलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अजितदादा काय बोलले, मी हे काय ऐकले नाही. पाहून घेतो. वाटल्यास विचारतो", असे लंकेंनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये मॅरेथॉन बैठका घेतल्या. या बैठकीनंतर त्यांनी टाकळी हाजी येथे सभा घेतली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे आणि नगर दक्षिणचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांना लक्ष केले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे निवडणूक लढवत आहेत. तिथे नीलेश लंके महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहेत.(Ahmednagar Constituency News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Lanke
Nagar News: 'युपीच्या कामगारांना आमचेच संरक्षण', योगींनी नगरमध्ये पाऊल ठेवण्याआधी लंकेंची टोलेबाजी

अजित पवार म्हणाले, 'त्या नीलेश लंके(Nilesh Lanke) यांना मीच पक्षामध्ये आणले. शरद पवारांना तो काळा का गोरा हे माहिती पण नव्हते. मी त्याला तिकीट देऊन निवडून आणले. त्याच्या मतदारसंघांमध्ये भरघोस, असा निधी दिला. मात्र जेव्हा गरज होती तेव्हा ते तिकडे गेले. एकदा निष्ठा ठेवली म्हणजे निष्ठेनीच राहिले पाहिजे. आम्ही जर विकास निधी नाही दिला तर बोला.', अशा शब्दांत अजित पवार यांनी नीलेश लंके यांना सुनावले.

मात्र यावर नीलेश लंके यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. 'दादा काय बोलले हे मी ऐकले नाही. पाहिले नाही. विचारतो.' असे बोलून विषय नीलेश लंके यांनी संपवण्याचा प्रयत्न केला.

महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे यांनी शरद पवारांनी 10 उमेदवार उभे केले तरी ते पडतील, अशी टीका केली होती. यावर देखील नीलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "अहो ते सांगतात की, 50 वर्षांपासून ते या जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. त्यांना साधे मेडिकल कॉलेज आणता आली नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांना खासदार म्हणून कुठेच काम करता आले नाही. त्यांनी व्यक्तिगत टीका टिपणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करावी. कोणत्या खासदाराचे काम असते डाळ आणि साखर वाटणे. त्यांना अपयश दिसू लागले आहे.', असेही नीलेश लंके यांनी म्हटले.

Nilesh Lanke
Lok Sabha Election 2024 : फडणवीस - एकनाथ खडसे यांचा एकत्रित येण्याचा प्रसंग टळला; भुसावळच्या प्रचार सभेत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी नगरमध्ये सभा झाली. त्यांनी सभेत हिंदुत्वाच्या मुद्दा पुढे सरकावला. यावर नीलेश लंके म्हणाले, "भाजप सरकार जाणीवपूर्वक जाती जातींमध्ये तेढ निर्माण करत आहे. देश विकासाच्या मुद्द्यावर नेण्याऐवजी अधोगतीकडे घेऊन जाण्याचा हा प्रकार आहे. आम्हाला हिंदुत्व मान्य आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरापगड जातीचे हिंदुत्व हवे आहे". आम्हाला युपी आणि गुजरातचे हिंदुत्व मान्य नाही, असाही टोला निलेश लंके यांनी लगावला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com