Nagar News: 'युपीच्या कामगारांना आमचेच संरक्षण', योगींनी नगरमध्ये पाऊल ठेवण्याआधी लंकेंची टोलेबाजी

Nilesh Lanke Loksabha Candidate: धन शक्ती पराभूत होणारच, यावर आमचा ठाम विश्वास आहे. काल-परवापासून लक्ष्मीचे दर्शन चालू झाले आहे. 'कुछ भी करो, कुछ नही होता'. प्रत्येकाच्या मनात, घरात फक्त तुतारी वाजत आहे.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama

Loksabha Election : महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांनी 'तुम मुझे पांच दिन दो, मैं तुम्हे पांच बरश दूंगा', असे म्हणत श्रीगोंदेकरांना साद घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये येऊन गेले. आता युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नगरमध्ये येत रॅली काढणार आहेत. त्यांना ही सांगतो. सुपा एमआयडीसीची पायाभरणी शरद पवार साहेबांनी केली. तिथे सर्वाधिक युपीमधील कामगार आहेत. त्या युपीच्या कामगारांना आपणच संरक्षण देण्याचे काम करत आहोत. हे लक्षात घ्यावं, असा टोला मारत युपीच्या मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न नीलेश लंके यांनी केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी श्रीगोंद्याच्या सभेत जोरदार भाषण केले. लोकशाहीपासून ते संविधान वाचवण्यापर्यंत आणि शेतकर्‍यांपासून ते श्रीगोंद्यातील पाणीप्रश्नापर्यंत त्यांनी भाषण केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नीलेश लंके म्हणाले, "लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. संविधान वाचवायचे आहे. शेतकर्‍यांसाठी ही निवडणूक आहे. गेल्या दहा वर्षापासून भाजपने केंद्रात शेतकर्‍यांच्या हितासाठी एकही निर्णय घेतला नाही. कृषीप्रधान देशात सर्वाधिक आत्महत्या शेतकर्‍यांच्या होत आहेत. महाराष्ट्रात आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. सरकार घोषणा करून त्या अंमलात आणत नाही. कांदा, सोयबीनसह शेती उत्पादनाला भाव नाही. दूध धंदा बुडाला आहे. मग शेतकरी आत्महत्या करणार नाही, तर काय होणार.

पवार साहेबांनी शेतकर्‍यांचे कर्जमाफ केले. या सरकारमधील कृषी मंत्री कोण हे आज सांगता येत नाही". देशात जातीवाद आणि धर्मावर बोलत आहे. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) नगरमध्ये आले. त्यांनी हिंदू-मुस्लिमांवर भाष्य केले. आम्हाला हिंदूत्व शिकऊ नका. गुजरात आणि युपीचे हिंदूत्व आम्हाला मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे हिंदूत्व आम्ही मानतो, असे नीलेश लंके यांनी ठणकावून सांगितले.

Nilesh Lanke
Fadnavis and Vikhe News : बाळासाहेब विखेंचे स्वप्न पूर्ण करण्याची फडणवीसांची ग्वाही!

कांदा निर्यात बंदी उठवल्याचा खोटारडेपणा यावर नीलेश लंके यांनी जोरदार टीका केली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांना भेटून कांदा निर्यात बंदी उठवल्याचे सांगितले. मात्र वेगळीच झाले. खोट बोल पण रेटून बोल, अशी यांची स्थिती आहे. यांनी फक्त जिरवा-जिरवेचे राजकारण केले. रावणाचा देखील अहंकार संपला होता. ही निवडणूक सर्वसामान्यांनी हाती घेतली आहे. त्यामुळे धनशक्ती पराभूत होणारच, यावर आमचा ठाम विश्वास आहे. काल-परवापासून लक्ष्मीचे दर्शन चालू झाले आहे. 'कुछ भी करो, कुछ नही होता'. प्रत्येकाच्या मनात, घरात फक्त तुतारी वाजत आहे, असा विश्वास नीलेश लंके यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान यांच्यानंतर युपीच्या मुख्यमंत्र्याची रॅली नगरमध्ये होत आहे. सुपे येथील एमआयडीसीची पायाभरणी शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी केली. याच एमआयडीसीत युपीचे सर्वाधिक कामगार आहेत. त्यांना आम्हीच संरक्षण देतो, हे युपीच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं, असे सांगून ईडी, सीबीआयचा वापर करून राज्याला अस्थिर करण्याचे काम भाजपने केले आहे. शिवसेनेच्या अखंड हिंदुत्वाचे उदाहरण दिले जाते. ही शिवसेना (Shivsena) यांनी फोडली. त्या खालोखाल राष्ट्रवादी पक्ष फोडला. या वयात पवार साहेबांना त्रास दिला. बाळासाहेबांना स्वर्गात दुःख दिले. हे आम्ही आणि महाराष्ट्र विसरलो नाही, असे नीलेश लंके यांनी म्हटले.

...मैं आपको पांच बरश दूंगा!

नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी श्रीगोंदेकरांना साद घालत, 'तुम मुझे पांच दिन दो, मैं आपको पांच बरश दूंगा', असे म्हणत कुकडी, घोड, विसापूर पाणी प्रश्न आपण हाती घेतला आहे. पाणी कोण देत नाही, तेच बघतो. तुमच्यासाठी कॅनॉलवर येऊन झोपलो ना, सांगणार नाही. आपण शब्द दिला ना, दिला. आपण याबाबत ध्येय वेडे आहोत. या मतदारसंघाला पाणी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन नीलेश लंके यांनी सांगितले. साकळाई बाबत तुमच्याकडून मते घेतली. 50 वर्षांपासून साकळाईचे आश्वासन दिले गेले. खोटे बोलले गेले. आता मात्र तसे नाही.

साकळाईचे पाणी कसे आणायचे याचे मार्गदर्शन करायला थोरात साहेब आहेतच. असे सांगून रोहितदादांना माहीत आहे, आपलं काम! पाण्यासंदर्भात बैठक चालू असताना तिथे होतो. सर्वांचे चालू होते. मला विचारले, तुझे काय? यावर म्हटलो, आपल्याला काही कळत नाही. तुमचे सर्व होऊ द्या. कॅनॉल माझ्याच भागातून जातोय. पाणी नाही मिळाले, तर पाहातोच. ब्लास्टच करून टाकतो. त्यावर सगळे म्हणाले, याचे अगोदर मिटवा, असा किस्सा सांगून नीलेश लंके यांनी श्रीगोंदेकरांना पाण्याच्या लढाईबाबत आश्वासन दिले. श्रीगोंद्यात बिगर खुर्चीची सभा झाली आहे. रोहितदादा आणि आमची पैज सर्वाधिक मताधिक्य श्रीगोंद्यात असेल, अशी पैज लागली आहे आणि मी श्रीगोंद्यातील मताधिक्याबाबत निश्चिंत आहे, असेही नीलेश लंके यांनी म्हटले.

Nilesh Lanke
Osmanabad-Aurangabad Renaming : उस्मानाबाद, औरंगाबादच्या नामांतरावर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब; आता पुढे काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com