

Nashik Politics : निफाड तालुक्याच्या राजकारणात मागच्या वीस वर्षात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दिलीप बनकर व शिवसेना उबाठाचे माजी आमदार अनिल कदम यांचे वर्चस्व राहिले आहे. पण आता या दोघांनाही टक्कर देऊ शकेल अशा नव्या नेतृत्वाचा उदय निफाड तालुक्यात झाला आहे. यतीन कदम असे या नेतृत्वाचे नाव आहे.
नगरपालिका निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी आपल्या नेतृत्वाची झलक दाखवून दिली आहे. ओझर व पिंपळगाव बसवंत या दोन्ही नगरपालिकांमध्ये कदम यांच्या नेतृत्वात भाजपने सत्ता खेचून आणली आहे.
अनिल कदम व यतीन कदम हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. परंतु त्यांचे राजकीय मतभेद आहे. ओझर शहरावर आजवर कदम कुटुंबीयांचेच वर्चस्व राहिले आहे. यंदा ओझर नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक होती. यतीन कदम भाजपचे जिल्हाध्यक्ष असल्याने ही निवडणूक जिंकणे त्यांच्यासाठी महत्वाची होती.
तसेच अनिल कदम यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने कदम यांच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने देखील ही निवडणूक महत्वाची होती. परंतु या निवडणुकीत यतीन कदम यांनी सत्ता काबीज केल्याने अनिल कदम यांना मोठा धक्का बसला आहे.
दुसरीकडे पिंपळगाव बसवंत नगरपालिकेत आमदार दिलीप बनकर व भास्करराव बनकर हे दोन्ही विरोधक एकत्र आले होते. मात्र या दोघांची युती पिंपळगावकरांनी नाकारली. यतीन कदम यांच्या नेतृत्वात स्थानिक भाजप नेत्यांनी दोन्ही बनकरांना त्यांच्या होमग्राउंडवरच जबर धक्का दिला. भाजपच्या युवा नेत्यांवर विश्वास ठेऊन पिंपळगावकरांनी नगराध्यक्षपदासह भाजप-शिंदे गटाचे १९ उमेदवार निवडून दिले. ओझर व पिंपळगाव बसवंत दोन्ही ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष झाल्याने यतीन कदम यांच्या नेतृत्वाला झालर मिळाली.
विशेष म्हणजे यतीन कदम यांचे वडील दिवंगत रावसाहेब कदम हे शिवसेनेचे आमदार होते. त्यांच्यानंतर मातोश्री मंदाकिनी कदम यासुद्धा साडेसात वर्षे शिवसेनेच्या आमदार होत्या. पंरतु २००४ मध्ये दिलीप बनकर यांनी मंदाकिनी कदम यांचा पराभव केला. त्यानंतर २००९ व २०१४ मध्ये अनिल कदम यांनी दिलीप बनकर यांचा पराभव केला. त्यानंतर परत २०१९ व २०२४ मध्ये सलग अनिल कदम यांचा दिलीप बनकर यांनी पराभव केला. विशेष म्हणजे २०२४ मध्ये यतीन कदम यांनी दिलीप बनकर यांच्या विजयात किंगमेकरची भूमिका निभावली होती.
त्यामुळे यतीन कदम यांचे उभारलेले नेतृत्व पाहाता पुढच्या विधानसभेला यतीन कदम यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची देखील शक्यता आहे. यतीन कदम यांच्या रुपाने माजी आमदार अनिल कदम व आमदार दिलीप बनकर या दोन्ही नेत्यांना टक्कर देणाऱ्या नव्या नेतृत्वाचा उदय निफाड तालुक्यात झाला असून भाजप या नेतृत्वाला आजमवण्याची शक्यता आहे. येणाऱ्या जिल्हापरिषद निवडणुकीतही यतीन कदम यांचा या दोन्ही आजी-माजी आमदारांसोबत सामना बघायला मिळू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.