Nitesh Rane Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाचे मॉडेलच 'चायनीज'; नीतेश राणेंचा घणाघात

Hindu Samaj Morcha in Ahmednagar : रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसंच बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधासाठी सकल हिंदू समाजावतीने अहमदनगर शहरातून मोर्चा काढण्यात आला.
Nitesh Rane Vs Uddhav Thackeray
Nitesh Rane Vs Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : औरंगजेब आणि टिपू सुलतानचे स्टेटस ठेवणाऱ्याविरुध्द जोडे मारो आंदोलन होत नाही, असे म्हणत कडवट हिंदुत्वासाठी राज्य सरकार आहे.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्ववादी आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदूहित संरक्षक आहेत. बाकींच्याचे माहीत नाही. त्यांचे हिंदुत्वाचे मॉडेल चायनीज असेल, गंज चढलेला आहे", अशी टीका भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.

सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसंच बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधासाठी सकल हिंदू समाजावतीने भाजप (BJP) आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दिल्ली दरवाजा इथं आल्यानंतर तिथं सभा झाली. मोर्चात युवकांची संख्या अधिक होती. मोर्चा जसा पुढे सरकत होता, तशी मोर्चाच्या मार्गावरील बंद दुकाने खुली होत होती.

Nitesh Rane Vs Uddhav Thackeray
Balasaheb Thorat On BJP : आरोपी हिंदुत्ववादी संघटनेशी निगडीत? बाळासाहेबांचा सवाल, 'संरक्षण देणारे कोण?'

आमदार राणे यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने राजकारण सुरू असल्याची टीका केली. "छत्रपती आमचे आराध्य दैवत असून, त्यांच्या नावावर राजकारण सुरू आहे. यापूर्वी हडपसर इथं महाराजांची मूर्तीची विटंबना झाली. त्यावेळेस तथाकथित शिवभक्त बोलले नाहीत. औरंगजेब आणि टिपू सुलतानचे स्टेटस ठेवणाऱ्याविरुध्द जोडे मारो आंदोलन होत नाही. केवळ आपटे नावाचा हिंदू (Hindu) सापडल्याने जिहादींना खूश करण्यासाठी जोडे मारण्याचे नाटक सुरू आहे", अशी टीका आमदार राणे यांनी केली.

Nitesh Rane Vs Uddhav Thackeray
Eknath Shinde Vs Prajakt Tanpure : मुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही; आमदार तनपुरे का भडकले?

हल्ले रोखण्यासाठी कडवट हिंदुत्व हवे

रामगिरी महाराज काहीही चुकीचे बोलले नाहीत, असे म्हणत झाकीर हुसेन आणि इतर अनेक मुस्लिम धर्मगुरू तेच सांगत आहेत. मुस्लिम धर्म का सोडला जात आहे, याची कारणे रामगिरी महाराजांनी सांगितली. तीच कारणे मुस्लिम धर्मगुरू सांगत आहेत. परंतु तरीही आमच्यावर हल्ले होतात. हे हल्ले रोखण्यासाठी कडवट हिंदुत्व हवे. हा देश हिंदूंचा असल्याने हिंदू हिताची भाषाच केली जाणार, असे नीतेश राणे यांनी ठणकावून सांगितले.

हिंदूंचा दरारा आणि धाक निर्माण करा

नीतेश राणे यांनी जिहाद्यांना इशारा देत, काही मस्ती करायची ती बांगलादेश, पाकिस्तानमध्ये जाऊन करा. समाज माध्यमांवरून मौलवी धमक्या देत आहेत. त्यांचा कसा समाचार घ्यायचा हे मला माहीत आहे. हिंदूंचा दरारा आणि धाक निर्माण करण्याची गरज व्यक्त करत रामगिरी महाराज यांना संरक्षण देण्यास हिंदू समाज सक्षम आहे, असे नीतेश राणे यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com