Nitin Thackeray News : उमेदवारी जाहीर होण्याआधीच नितीन ठाकरेंना मिळाल्या लाखोंच्या देणग्या..!

Election Fund : इच्छुकापुढे आगामी काळात 'कोणता झेंडा घेऊ हाती' असा पेच.
Nitin Thackeray
Nitin ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Loksabha Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. नितीन ठाकरे यांना उमेदवारी मिळण्याआधीच समर्थकांनी निवडणुकीसाठी 25.87 लाखांची देणगी जाहीर केली. राज्यातील नावाजलेल्या शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ठाकरे सरचिटणीस आहेत. त्यांनी सोमवारी समर्थकांचा मेळावा घेतला.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी घेण्याबाबत समर्थकांची मते जाणून घेतली यावेळी बहुतांश सभासदांनी आगामी लोकसभा निवडणुकीत ॲड. ठाकरे यांनी उमेदवारी देवावी, असे मत मांडले. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी द्यावी, याबाबत मात्र मतभिन्नता आढळली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले ठाकरे यांच्यापुढे आगामी काळात 'कोणता झेंडा घेऊ हाती' असा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

Nitin Thackeray
ED Raid Delhi : मोठी बातमी ! केजरीवालांची चौकशीला दांडी ? ईडी अ‍ॅक्शन मोडवर; बड्या नेत्याच्या घरी छापा

माविप्र शिक्षण संस्थेचे सरचिटणीस, जिल्हा वकील संघ आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नाशिक शाखेचे अध्यक्ष अशी पदे भूषविणाऱ्या ठाकरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची इच्छा आहे. या संदर्भात काल झालेल्या मेळाव्यात त्यांनी समर्थकांची मते जाणून घेतली. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घ्यावी, याबाबत त्यांनी एक फॉर्म भरून घेतला. या फॉर्मवर भिन्न मते व्यक्त केलेली आढळली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे ठाकरे यांच्यापुढे आगामी काळात मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाकरे यांची पार्श्वभूमी विचारात घेता, त्यांच्या समर्थकांनी मात्र वाऱ्याच्या दिशेने जाण्याचा सल्ला देत महायुतीची उमेदवारी घेण्यास सांगितले. स्वतः ठाकरे हे देखील भाजपचे सदस्य आहेत. अशा स्थितीत ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी घेताना सध्याच्या महायुती विरुद्ध इंडिया आघाडी या राजकारणाचा फटका बसू शकतो.

त्यामुळे त्यांना उमेदवारीसाठी योग्य पक्षाची निवड करावी लागेल. ते कोणत्या पक्षाकडे उमेदवारी मागतात आणि कोणता पक्ष त्यांना उमेदवारी देतो, यावर आगामी राजकारणाची दिशा ठरेल. काल झालेल्या सभेत महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. जयंत जायभावे यांनी आगामी निवडणुक सर्व समाजांच्या सहभागातून होणार आहे. 'मविप्र' संस्थेला मोठा वारसा आहे. हा वारसा संघर्षाचा आहे.

'बहुजन हिताय बहुजन सुखाय' ही विचारसरणी, संस्थेच्या संस्थापकांचा वैचारिक वारसा लक्षात घेता कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घ्यावी, हा निर्णय ठाकरे यांनी काळजीपूर्वक घ्यावा असे सूचक विधान केले होते. त्यामुळे ठाकरे यांच्या बैठकीत उमेदवारी घेण्याचा निर्णय झाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करावी हे मात्र गुलदस्त्यातच त्यातच राहिले.

यावेळी बी. जी. वाघ, डॉ. बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, संदीप गुळवे, डॉ. ऋषिकेश आहेर, भालचंद्र पाटील यांनी मते मांडली. समर्थकांच्या या मेळाव्यात रवींद्र देवरे यांनी ठाकरे यांना निवडणुकीसाठी 11लाखांची देणगी जाहीर केली.

याशिवाय चंद्रकांत ठाकरे, अशोक बुणगे, किशोर माने, नंदू राजळे, अनिल कुंदे, विक्रम काळे, निवास मोरे, माणिक कुंदे, मंगेश राजळे, खंडू बोडके यांनी देणग्या जाहीर केल्या त्यात 15.87 लाखांच्या देणग्या घोषित करण्यात आल्या. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर होतात देणग्या मिळालेले ठाकरे हे पहिले उमेदवार असावे.

(Edited by Amol Sutar)

Nitin Thackeray
Loksabha Election 2024 : पराभूत होणाऱ्या जागा भाजप मित्रपक्षांना देणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com