Shivsena News : निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेला मोठा धक्का! नाशिकमध्ये 43 वर्षीय उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Shiv Sena Uddhav candidate Nitin Waghmare death : निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवाराचा नाशिकमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.
Nitin Waghmare Death
Nitin Waghmare DeathSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : निवडणुकीच्या रणधुमाळीत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहरात आणि राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उमेदवारीनंतर सक्रिय प्रचार सुरू

नितीन वाघमारे हे मनमाडच्या गायकवाड चौक परिसरात राहत होते. नगरपरिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 10 मधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज भरल्यानंतर त्यांनी सक्रिय प्रचाराला सुरुवात केली होती. दिवसरात्र धावपळ करताना त्यांनी परिसरातील मतदारांशी संवाद साधत कामाची गती वाढवली होती.

हृदयविकाराचा झटका

अखंड प्रचाराच्या कामात व्यस्त असतानाच मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्याची व्यवस्था केली जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी शहारताच त्यांच्या कुटुंबीयांवर तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

Nitin Waghmare Death
Pune Congress News : दिग्गजांच्या 'होम पिच'वर उमेदवारीसाठी 'आटापिटा'; पुण्यात 8 नगरपालिका- नगरपंचायतीत काँग्रेसला उमेदवार मिळेनात!

राजकीय प्रवास आणि नव्या पक्षात प्रवेश

नितीन वाघमारे यांचा राजकीय प्रवास विविध टप्प्यांतून गेला आहे. पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र यंदा पुन्हा नव्या उत्साहाने मैदानात उतरून लोकांचा विश्वास जिंकण्याचा त्यांचा निर्धार होता. काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला होता. पक्षाने त्यांना उमेदवारी देखील दिली होती. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळाल्याचे मत कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत होते.

Nitin Waghmare Death
Anant Garje & Gauri Garje : गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; वादाला कारण ठरलेलं अनंत गर्जेशी संबंधित 'ते' प्रकरण 4 वर्षे जुने?

शहरात शोककळा

मतदानापूर्वी अगदी काही दिवस आधी काळाने घात केलेल्या या घटनेने मनमाड शहरात शोककळा पसरली आहे. नितीन वाघमारे यांच्या निधनाने जनतेत आणि कार्यकर्त्यांत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकीबाबतचा निर्णय काय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com