Anant Garje & Gauri Garje : गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; वादाला कारण ठरलेलं अनंत गर्जेशी संबंधित 'ते' प्रकरण 4 वर्षे जुने?

Gauri Garje Death case takes a shocking turn as police reveal : गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा. पोलिसांनी अनंत गर्जेशी संबंधित 4 वर्षांपूर्वीचे पुरावे कोर्टात मांडले तर गर्जेच्या वकिलांकडून सहा मुद्द्यांवर काऊंटर आर्ग्युमेंट.
Anant Garje & Gauri Garje Crime
Anant Garje & Gauri Garje CrimeSarkarnama
Published on
Updated on

पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे यांनी 22 नोव्हेंबर रोजी वरळीत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात नमूद करण्यात आले होते.परंतु गौरीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

अनंत गर्जेची अटक आणि तीन दिवसांची पोलीस कोठडी

गौरीच्या मृत्यूप्रकरणी अनंत गर्जेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास अनंत स्वतः वरळी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी अनंत गर्जे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून रविवारी रात्री त्यांना अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयात सादर करण्यात आले, जिथे न्यायालयाने 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी गौरीच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून तपास अधिक गतीने सुरू आहे.

फॉरेन्सिक तपासाची धाव; पुराव्यांचा शोध

अनंत गर्जे वरळीतील बीडीडी चाळीत भाड्याने राहतो. घटनास्थळावरून नेमके काय घडले याची माहिती मिळवण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने गर्जेच्या घराची झाडाझडती घेतली. गौरीने आत्महत्या कोणत्या परिस्थितीत केली, तिच्या मृत्यूपर्यंत नेणाऱ्या घटना कोणत्या, याचे धागेदोरे शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे.

Anant Garje & Gauri Garje Crime
Gauri Garje Death Cace : लेकीच्या लग्नाचा शाही थाट, वडिलांकडून लाखोंचा खर्च; अनंत-गौरी गर्जेचा असा झाला विवाह...

न्यायालयातील घडामोडी आणि सरकारी बाजू

तपास अधिकारीच कोर्टात अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने सुरुवातीलाच प्रश्न उपस्थित केले. सरकारी वकिलांनी सांगितले की, आरोपीचे इतर एका महिलेशी संबंध होते आणि त्यामुळे गौरीने आत्महत्या केल्याची शक्यता तपासली जात आहे. प्रकरणातील इतर आरोपी फरार असून पुरावे नष्ट होण्याचीही शक्यता असल्याने 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून झाली.

Anant Garje & Gauri Garje Crime
Gauri Garje Death Case : गौरीच्या आत्महत्येआधी काय घडलं? सतत फोन अन् गाडी फिरवली..., पंकजा मुंडेंचा पीए अडचणीत!

अनंत गर्जेचे वकील यांनी बचाव करताना सांगितले की, आरोपीने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे व तपासात पूर्ण सहकार्य केले जात आहे. पोलिसांनी उल्लेख केलेला गर्भपाताचे प्रकरण 2021 पूर्वी घडलेले असून सध्याच्या घटनांशी त्याचा थेट संबंध नाही. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्या काळात निर्णय घेण्यात आला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. या गर्भपात प्रकरणाचा उल्लेख पोलिसांनी अनावश्यकरीत्या केल्याचा दावा बचाव पक्षाने केला. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ते सर्व घडल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच 29व्या मजल्यावरील रेफ्यूज एरियामधून गर्जे खोलीत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

चौकशीचे अनेक धागेदोरे; तपास आणखी गुंतागुंतीचा

गौरी गर्जेच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. तिच्या कुटुंबीयांचा हत्या प्रकरणाचा आरोप, गर्भपातासंबंधीची पार्श्वभूमी, आरोपीचे कथित संबंध आणि सीसीटीव्ही तपास यामुळे हा मुद्दा अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. 27 नोव्हेंबरपर्यंतच्या कोठडीत पोलिसांचा तपास कोणते नवे पुरावे समोर आणतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com