BJP Politics: महापालिकेची प्रभागरचना भाजपच्या पथ्यावर? विरोधक झाले सावध!

Four-member ward structure is more convenient for the ruling grand alliance or the BJP: चार सदस्यांच्या प्रभागरचनेमुळे विरोधी पक्षांना प्रबळ उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार.
Eknath Shinde, Girish Mahajan & Ajit Pawar
Eknath Shinde, Girish Mahajan & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

NMC Election News: राज्य शासनाने महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सध्याच्या प्रभाग रचनेत फारसा बदल अपेक्षित नाही. मात्र चार सदस्य प्रभाग रचना भाजपच्या सोयीची असल्याची चर्चा आहे.

नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महायुती सरकारने पुन्हा एकदा चार सदस्य प्रभाग कायम ठेवले आहेत. त्यामुळे नगरसेवकांची संख्या कायम असेल. मात्र प्रभाग आरक्षण सोडत अद्याप जाहीर झालेली नाही.

यापूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत अशीच प्रभाकर रचना होती. यामध्ये सत्ताधारी भाजपने आणि शिवसेनेने उमेदवार देताना खबरदारी घेतली होती. त्या तुलनेत विरोधकांकडे मोठ्या मतदारसंघाला प्रभावित करील अशा उमेदवारांची वानवा होती. यंदा ती वाणवा अधिक तीव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे. मुळे सत्ताधारी महायुतीचे विशेषतः भाजपचे नेते खुशीत आहेत.

Eknath Shinde, Girish Mahajan & Ajit Pawar
Nashik Politics: 'त्या' वास्तूने दिले तीन खासदार, मंत्री... आता होणार इतिहासजमा, काय आहे कारण?

भारतीय जनता पक्षाने यंदा शतप्रतिशत भाजप अशी घोषणा दिली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे एकनाथ शिंदे देखील विरोधी पक्षातील इच्छुकांना मधाचे बोट लावण्यात व्यग्र आहेत.

भाजपच्या नेत्यांनी महापालिका निवडणुकीची तयारी करताना शहरातील सर्व प्रभागांमध्ये बुथरचना आणि सदस्य नोंदणी यावर भर दिला होता. सध्या भाजपने शहरात दोन लाख नऊ हजार सभासद नोंदणी केली आहे. तुलनेत महायुतीचे शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष तेवढा सक्रिय नव्हता. त्यामुळे नव्या प्रभाग रचनेचा लाभ उचलण्यासाठी भाजप जोमाने कामाला लागला आहे.

सध्या महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शहरभर आपला प्रभाव वाढविण्यावर भर दिला आहे. या पक्षातील अनेक माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले आहेत. पोलीस पक्षाचा आहे प्रभाव ठराविक भागातच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीही अशीच स्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडी महापालिका निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार की नाही याबाबत कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.

मावळत्या महापालिकेत १२२ नगरसेवक होते. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे ६६ नगरसेवक असल्याने ते स्वबळावर सत्तेत होते. उद्धव ठाकरे ३५, मनसे पाच, काँग्रेस सहा, राष्ट्रवादी काँग्रेस सहा, तीन अपक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले पक्षाचा एक नगरसेवक होता. यातील अनेक विद्यमान नगरसेवकांनी पक्षांतर केले असल्याने प्रस्थापित नगरसेवकांना प्रभाग रचनेची चिंता सत्तावू लागली आहे.

या परिस्थितीत भाजप आत्मविश्वासाने निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. तशी तयारी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष वगळता महायुतीच्या अन्य घटकांची नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये देखील अद्याप निवडणुकीचे धोरण आणि भूमिका याबाबत संभ्रम आहे. सध्याची पक्षांतराची स्थिती पाहता भाजपला आपल्या सर्व इच्छुकांना उमेदवारी देणे शक्य होईल की नाही हा गंभीर प्रश्न आहे. त्यातून शहराचे राजकारण बदलण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com