CM Eknath Shinde & Chhagan Bhujbal
CM Eknath Shinde & Chhagan BhujbalSarkarnama

Eknath Shinde News; महापालिकेच्या रस्त्यांचे गुणवत्तेचे नियंत्रण त्रयस्थ संस्थेमार्फत होणार

छगन भुजबळ यांच्या नाशिक महापालिकेच्या रस्त्यांबाबतच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

नाशिक : (Nashik) महापालिकेच्या (NMC) माध्यमातून मागील तीन वर्षात रस्त्यांवर ४८९ कोटी रुपये खर्च झाले असून, नागरिकांच्या तक्रारी व राजकीय पक्षांच्या आंदोलनाची दखल घेत कामाची गुणवत्ता त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी विधानसभेत दिली. (Nashik municiple corporation roads quality is discussion in assembly)

CM Eknath Shinde & Chhagan Bhujbal
Shocking News; संपर्कप्रमुखांनीच फोडले शिवसेनेचे 13 नगरसेवक?

सध्या रस्त्यांवरील खड्ड्याला महानगर गॅस लिमिटेड कंपनी, तसेच रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामे जबाबदार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

CM Eknath Shinde & Chhagan Bhujbal
ACB News; चक्क पुरूष प्रसाधनगृहात लाच स्विकारली?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील रस्त्यांच्या गुणवत्ता संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. रस्त्यांचे गुणवत्ता राखण्याची जबाबदारी बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे आहे.

गुणवत्ता व नियंत्रण विभागाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने गुणवत्ता व नियंत्रण विभागाची चौकशी केली आहे का, असा सवाल श्री. भुजबळ यांनी उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी यापुढे महापालिकेच्या गुणवत्ता व नियंत्रण संदर्भातील कामे त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.

यावरून महापालिकेच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागावर अविश्वास दर्शविण्यात आला आहे. अडीच वर्षात साडेसहाशे कोटी रुपये खर्च झाल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात ४८९.७२ कोटी रुपये खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. गुणवत्ता पूर्ण कामे करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन कामाचे गुणवत्ता व नियंत्रणाच्या दृष्टीने त्रयस्थ संस्था निवडणुकीची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगितले.

एमएनजीएल, फायबरमुळे खड्डे

शहरात सद्यःस्थितीमध्ये भुयारी गटारीचे कामे सुरू आहे. पाणीपुरवठ्याची तसेच भूमिगत गॅस पाईपलाईनची कामेदेखील सुरू आहे. रिलायन्स व एअरटेल, जिओ फायबर कंपन्यांचे केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने त्यासाठी रस्ते खोदकाम करावे लागते. महापालिका हद्दीत स्मार्टसिटी अंतर्गतदेखील विकासकामे सुरू असल्याचे सांगताना खासगी कंपन्यांकडून होत असलेल्या खोदकामावर रस्त्यांच्या गुणवत्तेचे खापर फोडले जात असल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com