Ajit Pawar on SC comment : आजवरच्या कोणत्याही सरकारला नपुंसक असे हिणवलेले नाही!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारसारखा अवमान आजवरच्या एकाही सरकारचा झालेला नाही.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

नाशिक : (Nashik) आजवर राज्याचे अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र एकाही मुख्यमंत्र्यांच्या सरकारला (Maharashtra Government) कोणी नपुंसक म्हटले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने (SC) सध्याच्या सरकारला नपुंसक म्हटल्याने हा या सरकारचा अपमान आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लक्षात घ्यावे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. (NCP leader Ajit Pawar criticize present government on onion Farmers policy)

Ajit Pawar
Nashik APMC News : देविदास पिंगळे, बबनराव घोलप एकत्र आल्याने विरोधक अस्वस्थ!

विरोधी पक्षनेते अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असे सांगितले.

Ajit Pawar
Jayant Patil On Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी कायम राहावी, ही शरद पवार इच्छा!

यावेळी ते म्हणाले, आजवर अनेक मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल आपण पाहिला आहे. त्यांनी केलेले कामकाज व राज्य सरकारचे धोरण याबाबत भिन्न मते असु शकतील, मात्र सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारविषयी सर्वोच्च न्यायालयाने अतिशय गंभीर टिपणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सध्याच्या सरकारला नपुंसक म्हटले हा माझ्याच नव्हे तर राज्यातील प्रत्येकाच्या दृष्टीने सरकारचा अपमान आहे. जे सरकार 145 आकडा गाठेल, ते लोक सरकार चालवत असतात. परंतु सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीविषयी सध्याच्या सरकारने आत्मचिंतन करावं.

Ajit Pawar
Nashik ZP : सुहास कांदेंसाठी धावपळ...राहुल आहेरांकडे कानाडोळा!

ते पुढे म्हणाले, आपल्या देशाच्या संविधानामध्ये सांगितले आहे की, प्रत्येकाने आपल्या जाती, धर्माचा आदर करावा. महापुरुषांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे, ती प्रत्येकाने लक्षात घ्यावी. सगळ्या मुख्यमंत्र्यांचा काळ बघितला तर, न्यायालयाने आजवर नपुंसक असं म्हटलेले नाही. त्यामुळेल सध्याच्या सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांच्या विरोधात अवमानाचा खटला सुरु आहे. याबाबत काय भूमिका घ्यावी तो त्यांचा अधिकार आहे. त्यांचे वकील त्यांची बाजू मांडण्याचे काम करेल. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील समन्स पाठवण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत मत व्यक्त करणे घोईचे ठरेल.

Ajit Pawar
Jayant Patil News : लाईट गेली तरी जयंत पाटील थांबले नाहीत; मोबाईल टॉर्चच्या उजेडात ठोकले भाषण!

राज्यात कांदा उत्पादकांची मोठी अडचण आहे. राज्य शासनाने नाफेड कांदा खरेदी करेल असे म्हटले होते. मात्र राज्य विधीमंडळाचे अधिवेशन थांबल्यावर ही कांदा खरेदी देखील बंद झाली आहे. आम्ही अधिवेशनात कांद्याला प्रती क्विंटल हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली. तेव्हा सरकारने तीनशे रुपये जाहीर केले. आम्ही पुन्हा अनुदान वाढवण्याची मागणी केली. त्यानंतर सरकारकडून साडे तीनशे रुपये अनुदान देण्यात आले. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. आम्ही वेगवेगळी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावर काहीच झालेले नाही. बऱ्याच ठिकाणी खरेदी केंद्र बंद आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com