Nashik News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे हेसुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. मात्र, खडसे यांनी ट्विट करून अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका, असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. Eknath Khadse on Bjp
जळगाव जिल्ह्यात सध्या भाजपचा दबदबा वाढला असून, मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकच राहणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांचेच काय तेवढे आव्हान भाजपसमोर आहे. त्यातही मागील सात ते आठ दिवसांपासून खडसे पुन्हा भाजपसोबत जातील, अशा चर्चा सुरू झाल्यात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीच्या जागावाटपात जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघ दोन्ही जागा भाजपकडेच राहतील अशी शक्यता आहे, तर दुसरीकडे आता महाविकास आघाडीमध्येदेखील जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांची वाटणी झाली आहे. काँग्रेसचे (Congress) रावेर मतदारसंघातील संभाव्य उमेदवार डॉ. उल्हास पाटील भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसकडून या जागेवरील दावा आपसूकच सैल झाला आहे. त्यामुळे येथून एकनाथ खडसे भाजपला आव्हान देतील, असे चित्र आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवेल. त्याच्याच तयारीसाठी आदित्य ठाकरे लवरकरच जळगावला डेरेदाखल होतील.
लोकसभेच्या जागांचे चित्र स्पष्ट होत असतानाच खडसे पुन्हा भाजपमध्ये (BJP) प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली. मंत्री गिरीश महाजन यांनीही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करीत खडसे वरिष्ठकडे गेले असतील तर मला माहीत नाही, असे स्पष्ट केले. यामुळे या खडसेंच्या भाजप प्रवेशाला आणखीच हवा मिळाली.अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपचा रस्ता धरल्यानंतर खडसेंविषयी चर्चांना उधाण आले. कार्यकर्त्यांकडूनही चौकशी सुरू झाल्याने खडसेंनी आज X वर ट्विट करीत आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याबाबत संभ्रम निर्माण व्हावा, यासाठी या अफवा पसरविल्या जात असून, कार्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन खडसे यांनी करीत भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. Eknath Khadse on Bjp
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.