Nashik News : नाशिककर तहानलेले असतानाही पाणी का सोडले, सत्ताधारी गप्प कसे?

Water Released for Marathwada : सत्ताधारी नेते नाशिककर जनतेची जबाबदारी विसरले का?
Water Released for Marathwada news
Water Released for Marathwada news Sarkarnama
Published on
Updated on

Nashik: उत्तर महाराष्ट्रातून मराठवाड्यात पाणी सोडल्यावरून वाद निर्माण झाला आहे. जायकवाडी धरणामध्ये सध्या ४८ टक्के साठा आहे. त्यात त्यांचा पिण्याचा आणि औद्योगिक पाण्याचा प्रश्न सुटतो आहे. तरीही प्रचंड टंचाई असलेल्या नाशिकच्या धरणातून पाणी सोडताना प्रशासन गप्प का आहे. सत्ताधारी नेते नाशिककर जनतेची जबाबदारी विसरले का? असा संतप्त सवाल शिवसेना नेते वसंत गिते यांनी केला आहे.

नाशिकच्या नेत्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका व त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केवळ प्रसिद्धीसाठी होता का, असे गिते म्हणाले. जायकवाडीच्या धरणातील उपलब्ध असलेला पाणीसाठा हा पिण्यासाठी पुरेसा आहे, मात्र सिन्नर, येवला, नांदगाव, चांदवड यासह जिल्ह्यामध्ये सिंचनाचे काय? पिण्याच्या पाण्याचीही स्थिती नाशिक जिल्ह्यात वाईट झालेली शकते. मात्र नाशिक जिल्ह्यातील नेतृत्व आपल्या मागणीत कमी पडले आहे हे स्पष्ट आहे. यामुळे मराठवाड्यातील शेतीसाठी गंगापूर व दारणा प्रकल्पातील पिण्याचे सिंचनाचेपाणी सोडण्याची वेळ आली आहे.असे केल्याने नाशिकच्या द्राक्ष तसेच अन्य पिकांचे काय होणार, याचा विचार सरकार करायला तयार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Water Released for Marathwada news
Sadabhau Khot : 'गिरे तो भी टांग उपर' ही शेट्टींची अवस्था; सदाभाऊ खोतांनी फटकारलं!

राज्यात फोडाफोडीचे राजकारण झाल्यावर नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदार सत्ताधारी झाले आहेत. यासाठीच त्यांनी सत्तेची साथ दिली आहे का. सत्तेत राहून नाशिकच्या शेतकरी व जनतेशी केलेला हा धोका आहे. हे दुर्दैव आहे, असे गिते म्हणाले.

"पालकमंत्री याबाबत काहीच करू शकले नाहीत. जिल्ह्यामध्ये कमी पावसामुळे अनेक जिल्ह्यातली परिस्थिती पिण्याच्या पाण्यासाठी आसुसले आहेत. अशात भविष्यात पिण्यासाठी पाणी शिल्लक राहिले नाही तर काय करणार असं म्हणत पाणी सोडण्याची घाई ही गोष्ट दुर्दैवी आहे," अशी खंत गिते यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com