Sadabhau Khot : 'गिरे तो भी टांग उपर' ही शेट्टींची अवस्था; सदाभाऊ खोतांनी फटकारलं!

Swabhimani Farmers Association: शेतकरी नेत्याचा वारू गुलालात उधळायला लागला आहे.
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama
Published on
Updated on

Sangli: ऊस आंदोलनावरून दोन शेतकरी नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्यानंतर त्याला राजू शेट्टींनी उत्तर दिले आहे. शेट्टीवर खोतांनी आज पलटवार केला. ते सांगलीत बोलत होते.

"गिरे तो भी टांग उपर" अशी अवस्था कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी नेत्याची झाली आहे," अशा शब्दांत सदाभाऊ खोतांनी शेट्टीचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. "शेतकरी नेत्याचा वारू गुलालात उधळायला लागला आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे," अशी टीका सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर केली आहे.

"शेतकऱ्यांची फसवणूक करून आंदोलनाला यश मिळाले म्हणून स्वतःच्याच अंगावर गुलाल टाकण्याचे काम केले, पण हा गुलाल लोकसभेसाठी होता. शेतकऱ्याला तुम्ही फसवलं आहे; पण लोकसभेला बहुजन समाज तुमची जागा दाखवून देईल," असा इशारा खोतांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sadabhau Khot
Manoj Jarange Patil: गरजवंत मराठ्यांचा लढवय्या, जिगरबाज योद्धा!

शेतकऱ्यांना उसाची पहिली उचल ३३०० रुपये मिळाली असती. मात्र, शेतकरी नेत्याने कारखानदारांशी सेटलमेंट केली. ऊसदरात ५०,१०० रुपयांवर तडजोड करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे मोठे पाप केले आहे. गुरुवारी आंदोलन करून स्वतःच्याच अंगावर गुलाल उधळून घेतला आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर केली. कारखानदार व राजू शेट्टी यांचा कट उधळून लावू, असा इशाराही त्यांनी दिला.

Sadabhau Khot
Prithviraj Chavan: माजी मुख्यमंत्र्यांनी टोचले सत्ताधाऱ्यांचे कान; प्रीतिसंगमावर या,आत्मपरीक्षण करा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com