पोलिसांना आता ८ तासांची ड्यूटी अन् १ लाख घरे!

अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या ११९ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा.
Dy CM Ajit Pawar
Dy CM Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : पोलिसांच्या (Maharashtra Police) कामकाजाबाबत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये त्यांची आठ तासांची ‘ड्यूटी’ करण्यासह टप्प्याटप्प्याने राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे (Houses) बांधण्याचा समावेष आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

Dy CM Ajit Pawar
भ्रष्टाचार करुन मान शरमेने खाली जाईल असे वागू नका!

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या ठळक घोषणांमध्ये, महाराष्ट्र पोलिस अकादमीतील सराव इमारतीला शंभर टक्के निधी देणार, राज्यातील जुन्या ८७ पोलिस ठाण्याचे नूतनीकरण, प्रत्येक पोलिस शिपाई हा अधिकारी होऊन होणार निवृत्त होणार याचा समावेष आहे.

Dy CM Ajit Pawar
बडतर्फ कर्मचारी रुजू होण्यासाठी झाले आक्रमक!

महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या ११९ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा झाला. त्या वेळी श्री. पवार बोलत होते. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, अपर पोलिस महासंचालक संजीवकुमार, पोलिस अकादमीचे संचालक राजेशकुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.

चकरा मारायला लावू नका

श्री. पवार म्हणाले, की पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम करताना प्रत्येकाने आता आपण सेवक आहोत, हे जाणून घेत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवाव्यात. पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना प्रत्येक तक्रार, प्रश्‍न कायद्याच्या चौकटीत न बांधता माणुसकीच्या नात्यातून, बंधुत्वाची भावाना जोपासत सोडविण्याचा प्रयत्न करावा. आपण सर्व सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी कुटुंबातून आलो आहोत, याची जाणीव ठेवत सर्वांच्या वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन पोलिस ठाण्याच्या चकरा मारायला लावू नका. जबाबदारी पार पाडताना कुठल्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता जे योग्य आहे तेच करा. राजकीय, सामाजिक, धार्मिक विचारसरणी या गोष्टींना वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात स्थान असणार नाही, याची काळजी घ्या. शिवाय भ्रष्टाचार करून आपली व आपल्या कुटुंबाची मान शरमेने खाली जाईल, असे वागू नका.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com