भ्रष्टाचार करुन मान शरमेने खाली जाईल असे वागू नका!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ११९ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ
Ajit Pawar With Best cadet PSI
Ajit Pawar With Best cadet PSIsarkarnama

नाशिक : मुंबई (Mumbai) येथे झालेल्या दहशतवादी ह्ल्लयामध्ये (Terror Attack) शहीद झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे (Tukaram Omble) यांनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्र पोलीस दलाची शान वाढविली. कामगिरीनेच पोलिस सरस ठरत असल्याने आपण देखील पोलिस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्य पार पाडताना पदाचा गौरव कसा वाढेल असेच काम करावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

Ajit Pawar With Best cadet PSI
किरीट सोमय्या राणा दाम्पत्याचे नातेवाईक की वकील?

येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या ११९ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, अपर पोलिस महासंचालक संजीवकुमार, पोलिस अकादमीचे संचालक राजेशकुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.

Ajit Pawar With Best cadet PSI
तीथे वातावरण तंग आहे, तीथे जायचा अट्टहास का केला?

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम करतांना प्रत्येक अधिकाऱ्याने आता आपण शासनाचे सेवक आहोत हे जाणून घेत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत त्यांची सोडवणूक करावी. पदाची जबाबदारी प्रामाणिपणे पार पाडताना प्रत्येक तक्रार प्रश्‍नाला कायद्याच्या बांबू न टाकता माणूसकीच्या नात्यातून, बंधूत्वाची भावना जोपसात सोडविण्याचा प्रयत्न करावा.

ते पुढे म्हणाले, आपण सर्व सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी कुटुंबातून आलो आहोत. याची जाणीव ठेवावी. सर्वांच्या वेळेचे महत्व समजून घ्यावे. त्यांना पोलिस ठाण्याच्या चकरा मारायला भाग पाडू नका. आपण सर्व उच्चशिक्षित असल्याने आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा समाजाला कसा करुन देता येईल हे पहावे. आपली जबाबदारी पार पाडताना कुठल्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता जे योग्य आहे तेच करावे. भ्रष्टाचार करुन आपली व आपल्या कुटुंबाची मान शरमेने खाली जाईल असे वागू नका असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले, की आपण सर्वांनी पोलीस खात्याची निवड जाणीवपूर्वक केली असल्याने जनसामान्यमध्ये पोलीस दलाप्रती आदर वाढेल असेच काम करावे. प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीची दखल घ्या. गणवेशाची प्रतिष्ठा जपा कारण समाजामध्ये आपले अस्तीत्व गणवेशामुळे ठळकपणे उमटत असते. त्यामुळे चुकीच्या कामांना पाठिंबा देवू नका, मोहाला बळी पडू नका. आता जग वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे कामाबरोबर तंत्रज्ञानात स्वत:ला अपडेट ठेवावे असेही श्री. वळसे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या विकासाला आवश्‍यक असलेल्या सर्व गरजा पूर्ण करण्याचे आश्‍वासन देखील दिले.

चव्हाण, म्हैसाळे उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी

११९ व्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक (खात्यातंर्गत) दीक्षांत संचलन सोहळ्याप्रसंगी उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी व बेस्ट ट्रेनि ऑफ द बॅचचा सोर्ड ऑफ रिव्हॉल्वरचा मान गणेश चव्हाण यांना देण्यात आला. उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी महिला पुरस्काराचा मान तेजश्री म्हैसाळे यांना मिळाला. उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी (द्वितीय) विशाल मिंढे, स्टडीज सिल्वर बॅटेन पुरस्काराने प्रतापसिंह डोंगरे यांना गौरविण्यात आले.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com