Satyajeet Tambe Rahul Gandhi : राहुल गांधींनी यांना 'गुड मॉर्निंग', 'गुड नाईट', असा मेसेज करावा का? 'NSUI'चे शेख यांनी आमदार तांबेंना धू-धू धुतले (VIDEO)

NSUI Amir Shaikh Responds to MLA Satyajeet Tambe Allegations Against Congress Rahul Gandhi in Pune : काँग्रेस नेते राहुल गांधींना एक तासात भेटून दाखवण्याच्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या चॅलेंजवर 'NSUI'चे अमीर शेख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
Satyajeet Tambe Rahul Gandhi
Satyajeet Tambe Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics Congress NSUI : राहुल गांधी अ‍ॅक्सेसेबलच नाहीत, असे सांगताना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना राहुल गांधी यांना एका तासांत भेटून दाखवायचं चॅलेंज दिलं होते. त्यावरून आता चांगलेच राजकारण पेटलं आहे.

काँग्रेसच्या 'NSUI' संघटनेने आमदार सत्यजीत तांबे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. 'NSUI'चे अमीर शेख यांनी सत्यजीत तांबे यांना जोरदार प्रत्युत्तर देताना, राहुल गांधींनी यांना काय आता 'गुड मॉर्निंग', 'गुड नाईट', असा मेसेज करावा का? असा खोचक सवाल केला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी सकाळ माध्यम समूहाच्या 'सरकारनामा' डिजिटलशी संवाद साधताना, काँग्रेसच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली होती. ही चिंता व्यक्त करताना, राहुल गांधींना टार्गेट केलं होते. राहुल गांधी अ‍ॅक्सेसेबलच नाहीत, असे सांगताच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना एका तासांत भेट घेऊन दाखवावी, असं चॅलेंज दिलं होतं.

आमदार तांबे यांच्या या चॅलेंजमुळे राज्यातील काँग्रेसला (Congress) एकप्रकारे आव्हान होते. याशिवाय, काँग्रेसच्या 'NSUI' या संघटनेच्या कार्यपद्धतीवर टीका केली. गेल्या 15 वर्षांपासून एकच अध्यक्ष असून, ही संघटना कुठेही दिसत नाही, असा टोला देखील आमदार तांबेंनी लगावला होता. काँग्रेसच्या विचारसरणीत घडलेले ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे आमदार सत्यजीत तांबे यांना 'NSUI' संघटनेचे अमीर शेख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Satyajeet Tambe Rahul Gandhi
Aaditya Thackeray vs Ashish Shelar : मुंबईच्या 'तुंबई'वरून राजकारण तापलं; शिवसेनेचे ठाकरे, काँग्रेसचे सपकाळ अन् भाजपचे शेलार भिडले

मामा अन् वडिलांचे होऊ शकले नाही

अमीर शेख म्हणाले, "सत्यजीत तांबे यांना काँग्रेसमध्ये असल्यापासून माझ्या नावाचे डोहाळे येत होते. काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी माझं नाव घेणं बंद केलं. खरं तर जो व्यक्ती मामा आणि वडिलांचा होऊ शकला नाही, तो कुठलाही पक्षाचा, संघटनेचा अन् लोकांचा होणार नाही. हे माझं अन् महाराष्ट्रातील जनतेचं मत आहे".

Satyajeet Tambe Rahul Gandhi
Goa BJP Minister Corruption : गोव्यातील भाजप सरकारमध्ये चाललंय काय? CM सावंतांच्या खात्यावर मंत्री गावडेंच्या आरोपाची दिल्लीत दखल, कारवाईकडे लक्ष...

राहुल गांधींनी अजून काय करावं...

'राहुल गांधी यांच्या घरी येऊन राहून गेलेले आहेत. सकाळचा नाश्ता त्यांनी तुमच्या घरी केलेला आहे. आता त्यांनी तुम्हाला 'गुड मॉर्निंग', 'गुड नाईट' कराव. आता याच्यापेक्षा कुठला अ‍ॅक्सेस कुठल्या नेत्यानं कुठल्या कार्यकर्त्याला दिला आहे की, ते पार ते तुमच्या घरी येऊन राहिलेले आहेत. पक्षाची गद्दारी केली, घाट्यात टाकलं, पक्षाची इज्जत रस्त्यावर काढली, त्यानंतर राहुल गांधींनी तु्म्हाला का भेटावं?', असा प्रश्न अमीर शेख यांनी केला.

प्रसिद्धीसाठी काँग्रेसच्या नावाचा वापर

'काँग्रेसवर बोलण्याची तुमची उंची आहे का? कधीपर्यंत तुम्ही काँग्रेसचं नाव घेऊन राजकारणात जिवंत राहणार आहात? जोपर्यंत तुम्ही राजकारणात होतात, तोपर्यंत तुम्ही काँग्रेसच्या नावावर फिरत होतात. लोकं देखील तुम्हाला मानत होती. जेव्हापासून तुमची पक्षातून हकालपट्टी झाली आहे, तेव्हापासून लोक अन् नेते देखील तुम्हाला विचारत नाही. प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी तुम्हाला काँग्रेसचे नाव घेण्याची गरज वाटते आहे, हे कुठेतरी हास्यास्पद आहे', असा टोला देखील अमीर शेख यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com