Chhagan Bhujbal : 'पुन्हा लढू, हा लढा मंत्रिपदाचा नाही, तर अस्मितेचा...'; छगन भुजबळांचा सूचक इशारा

OBC leader Chhagan Bhujbal addresses supporters in Nashik : महायुती मंत्रिमंडळात डावलण्यात आलेले ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी नाशिक इथल्या संपर्क कार्यालयात बैठक घेत कार्यकर्त्यांना लढण्याची तयारी ठेवा, अशा सूचना केल्या.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी न केल्याने नाराज झालेले ओबीसी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाशिक इथं संपर्क कार्यालयात त्यांनी समता परिषद आणि कार्यकर्त्यांनी संवाद साधला.

'शून्यातून लढा देऊन निर्मिती करणारे लोक आहोत. आपण पुन्हा लढू, हा लढा मंत्रि‍पदाचा नाही, तर अस्मितेचा आहे', अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी करून न घेतल्याने ते नाराज आहे. नागपूर हिवाळी अधिवेशन सोडून ते पुन्हा नाशिकमध्ये आले आहेत. समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संवाद साधत आहे. नाराज भुजबळ यांनी पक्ष नेतृत्व अजित पवार यांच्यावर देखील आगपाखड केली आहे. कोणता वादा? मी दादाला मानत नाही, अशा शब्दात भुजबळ अजितदादांविरोधात आक्रमक झाले आहे.

Chhagan Bhujbal
MP Varsha Gaikwad : 'तरी बाबासाहेब नेहमीच "फॅशन"मध्ये राहतील'; खासदार गायकवाडांचा अमित शाह यांना इशारा

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांच्या येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी बोलताना, आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू, हा लढा मंत्रिपदाचा नाही, तर अस्मितेचा आहे. आपण अनेकदा मंत्रिपदावर काम केलं आहे. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून आपण काम करतो आहोत. त्यामुळे हा प्रश्न मंत्रिपदाचा नाही. आपला हा लढा अस्मितेचा लढा आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंघ राहून काम करावे. मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय, आपण घेणार नाही, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.

Chhagan Bhujbal
TOP Ten News - 'आप'चे संजय सिंह पुन्हा अडचणीत; फडणवीस-ठाकरे भेटीत काय घडलं? - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

तसेच येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने विशेष मेहनत घेऊन मला पाचव्यांदा संधी दिली. त्याबद्दल छगन भुजबळांचे आभार मानले. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे. मांजरपाड्याच्या माध्यमातून येवल्याला अधिक पाणी देण्याचा शब्द आपण येवलेकरांना दिला आहे. तो पुढील काळात आपल्याला पूर्ण करायचा आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबध्द असून विकासाची कामे अविरतपणे सुरू राहतील. येवला-लासलगाव मतदारसंघ आपल्याला एकसंघ ठेवायचा आहे. आगामी काळात येवला मतदारसंघात सुरू असलेली विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिली. माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, विश्वासबापू आहेर, डी.के.जगताप, अरुणमामा थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com