MP Varsha Gaikwad : 'तरी बाबासाहेब नेहमीच "फॅशन"मध्ये राहतील'; खासदार गायकवाडांचा अमित शाह यांना इशारा

Amit Shah statement on Babasaheb Ambedkar : भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड संतापल्या.
Varsha Gaikwad | Amit Shah
Varsha Gaikwad | Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतील भाषणावर भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची 'फॅशन' झाली आहे, या विधानावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड चांगल्याच संतापल्या आहेत.

खासदार गायकवाड यांनी शाह यांना यावर आपण संविधान मानता का? आपली वृत्ती 'RSS' आणि 'मनुवादी' असल्याचे पुन्हा समोर आले. परंतु तुम्ही काहीही केलं, कितीही कट रचले, तरी बाबासाहेब नेहमीच "फॅशन"मध्ये राहतील, कारण 'न्याय' हीच खरी 'फॅशन' आहे, असा टोला खासदार गायकवाड यांनी लगावला.

"भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आजकाल आंबेडकर-आंबेडकर-आंबेडकर, असे नाव घेण्याची फॅशन झाली आहे. इतक्या वेळेला देवाचं नाव घेतले असताना स्वर्ग प्राप्त होईल, असे विधान केले होते. त्यावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

अमित शाह यांच्या मनुवादी वृत्तीचा त्यांनी निषेध केला आहे. बाबासाहेबांविषयीची विचारधारा तुम्हाला माहिती आहे का बाबासाहेब आमचे आराध्य दैवत आहे. आमच्या अस्मिता आहे. यावर तुम्ही घाला घालण्याचा प्रयत्न करत असून, तो आम्ही खपवून घेणार नाही", असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला.

Varsha Gaikwad | Amit Shah
Dinvishesh 18 December : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी; वाचा आजचे दिनविशेष

"महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांवर होणाऱ्या अन्यायाला कायमच "आउट ऑफ फॅशन" केलं. नेमकी हीच बाब आजही RSS आणि भाजपला खटकते. बाबासाहेबांनी उच्च-नीच, जात-पात यांची बंधनं तोडून प्रत्येकाला आपण सर्वप्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहोत, अशी शिकवण दिली. बाबासाहेबांनी RSSच्या मनुवादी विचारसरणीला संविधानाच्या माध्यमातून गाडलं. जे बाबासाहेबांनी देशासाठी केलं, ते यांच्या सात पिढ्यांना, तर सोडाच पण पुढच्या शंभर पिढ्यांनाही साध्य करता येणार नाही", असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले.

Varsha Gaikwad | Amit Shah
One Nation One Election : भारतात यापूर्वी झाले होते 'वन नेशन वन इलेक्शन'!

"बाबासाहेबांनी देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून दिला. पण ज्यांना अन्याय करण्याची सवयच झाली आहे, त्यांना ते कसं पचेल? म्हणूनच कधी ते संविधान मान्य नसल्याचं सांगतात, कधी बाबासाहेबांचा पुतळा जाळतात, तर कधी संविधान बदलण्याचं वक्तव्य करतात. RSS आणि भाजपकडून बाबासाहेबांचा आणि आंबेडकरी चळवळीचा सतत अपमान करण्यात आला आहे", असेही वर्षा गायकवाड यांनी आरोप केला.

आज संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याने RSS आणि भाजपची मनुवादी वृती आणि महामानवाबद्दलची घृणास्पद भूमिका पुन्हा एकदा लोकांसमोर आली. राष्ट्रध्वज, राष्ट्रगान तुम्ही मानत नाही. काल संविधानावर गप्पा मारत होते. नागपूरमध्ये रेशीम बाग पण आहे, आणि नागरपूरमध्ये दीक्षा भूमी देखील आहे. या दोन्ही भूमी नागपूरमध्ये असल्या, तरी त्यामधील अंतर खूप मोठं आहे. विचारधारेत फरक आहे. आम्ही संविधान मानतो, तुम्ही मंडळी मनुस्मृती मानता. त्यांच्या वक्तव्याचा जितका निषेध करता येईल तितका कमी आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले.

बाबासाहेब आमचे आराध्य दैवत व आमची अस्मिता आहेत. आमच्या अस्मितेवर तुम्ही घाला घालण्याच्या प्रयत्न करत आहात, जे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. अमित शहा यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल संपूर्ण देशासमोर माफी मागितली पाहिजे. तुम्ही काहीही केलं, कितीही कट रचले, तरी बाबासाहेब नेहमीच "फॅशन"मध्ये राहतील, कारण न्याय हीच खरी फॅशन आहे, असा टोला देखील वर्षा गायकवाड यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com