Mumbai News : बदलपुरातील शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत आहे. गृह मंत्रालयाचा धाक गुन्हेगारांना राहिला नसल्याने गुन्ह्यांचे स्वरूप भंयकर होत चालले असून, शाळेतील मुली सुद्धा सुरक्षित नसल्याची टीका सरकारवर होऊ लागली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील सरकारला या घटनेवर फटकारले आहे.
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "सरकारचे फक्त कार्यक्रम सुरू आहेत. मोठ मोठाले कार्यक्रम करायचे आणि राजकीय भाषण ठोकायचे, याच्यात सत्ताधारी गु्ंतले आहे. याचा हा परिणाम आहे. दोन वर्षातील स्वरूपच भयंकर आहे, आणि यात सत्तेत तीन लोकं एकत्र आहे, ज्यापद्धतीने ते एकत्र, गठण झाले, त्यांची कार्यपद्धती सुद्धा खोक्यांवर अवलंबून, अशी कार्यपद्धती आहे. लक्ष नाही. राज्य म्हणून आपली जबाबदारी नाही. जनतेच्याप्रती लक्ष नाही. ती त्यांची जबाबदारी पाळत नाही, याचे हे चित्र दिसते". एक योजना आणली, त्याबद्दल काही म्हणणे नाही. परंतु संजय निराधार योजनेचे पैसे लोकांना गेलेले नाही. श्रावण बाळ योजनेचे पैसे गेलेले नाहीत. अनेक मुद्दे या सरकारविरोधात आहेत, असेही थोरात यांनी म्हटले.
गेल्या सात तासांपासून बदलापूरमध्ये पालकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. आंदोलनाचे कोणीही नेतृत्व करत नाही. आंदोलनाला चेहरा नसल्याने तोडगा निघत नाही.
प्रत्येकाची घटनेची विषयी संतप्त, अशी प्रतिक्रिया आहे. त्यामुळे पोलिसांना (Police) आंदोलनावर तोडगा काढताना अडथळे येत आहे. आंदोलनाला चेहरा नसल्यामुळे पोलिसांनी बदलापुरात अतिरीक्त पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. तसंच आंदोलनातील प्रत्येक घटनेंचे चित्रीकरण देखील सुरू केलं आहे.
आंदोलकांची समजूत काढण्यासाठी आता महायुती सरकारकडून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री गिरीश महाजन बदलापुराकडे रवाना झाले आहे. या दोन प्रमुख नेते आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेला कसे समोरे जाणार याकडे लक्ष लागले आहे.
परंतु विरोधकांनी सरकारच्या रोष व्यक्त केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी इथं राजकारण करायचे नाही. परंतु देवेंद्र फडणवीस गृह मंत्रालयाचा कारभार संभाळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला आहे. तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.