Sharad Pawar told History of 1977: तेव्हा फडणवीस प्राथमिक शाळेत असतील..; 'त्या' टिकेनंतर शरद पवारांनी इतिहासच सांगितला

Pune Politics: लोकशाहीत बैठका घेण्याचा आम्हाला अधिकार आहे.
Sharad Pawar told History of 1977:
Sharad Pawar told History of 1977:Sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar told History of 1977: "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 1977 साली वसंतदादांच्या मंत्रिमंडळातले 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते, तेव्हा पवार साहेबांनी केली ती मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदेंनी केली तर ती बेईमानी, हा कुठला न्याय," असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नाला शरद पवार यानी उत्तर दिलं आहे.

बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीसांना (Devendra Fadanvis) उत्तर दिलं आहे. "1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळचा भाजपही आमच्या सोबत होता. फडणवीस तेव्हा लहान असतील त्यामुळे त्यांना माहिती नसेल,पण त्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो.मी जे सरकार बनवलं होतं ते सर्वांना सोबत घेऊन बनवलं. त्यात त्यावेळचा जनसंघ, त्यातले उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर हशू आडवानी हेदेखील होते. आणखीही काही सदस्य होते. असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. पण मला वाटतं फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना त्याकाळातली फारशी माहिती नसेल. त्यांच्या अज्ञानापोटी ते अशी स्टेटमेंट करत असतात. असा टोलाही शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी लगावला.

Sharad Pawar told History of 1977:
BRS News : देश जिंकालयला निघालेल्या के. चंद्रशेखर राव यांना मोठा झटका; नेमकं काय झालं ?

पाटण्यात १९ पंतप्रधानांची बैठक झाली, अशी टिकाही भाजपने केली, या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी "आम्ही बैठका घेतल्यावर तुम्हाला चिंता का वाटली, असा प्रतिप्रश्न भाजपला केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवर टिका केली. भाजपचे काही नेते, हे लोक एकत्र कसे जमले, यांनी बैठका कशा घेतल्या, असे प्रश्न विचारत आहेत. पण विरोधकांच्या बैठकीवर सत्ताधाऱ्यांनी केलेली टिका हा खोडसाळपणा आहे. पण लोकशाहीत बैठका घेण्याचा आम्हाला अधिकार आहे. पण दुसऱ्याच दिवशी भाजपनेही त्यांच्या मित्रपक्षांच्या बैठका बोलवल्याचं आम्हाला दिसलं. तुम्ही बैठका घेऊ शकता, मग आम्ही बैठका घेतल्यावर तुम्हाला चिंता का वाटली, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.

Sharad Pawar told History of 1977:
Sharad Pawar Replied BJP : पाटणा बैठकीवरील भाजपच्या टिकेला पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...

तसेच "पाटण्यात झालेल्या बैठकीत पंतप्रधान पदाची चर्चाच झाली नाही. महागाई, बेरोजगारी आणि राज्यात काही ठिकाणी सांप्रदायिक शक्ती वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. अशा दंगलींमधून समाजात कशी दरी पडेल, याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. भाजप आज तशा प्रकारची पावले टाकत आहेत.जर देशात जातीय तेढ वाढली तर ते समाजाच्या दृष्टीने योग्य नाही. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी आपण एकत्र बसण्याची गरज आहे, हा चर्चेचा विषय होता." असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com