एक कोटी ज्येष्ठांनी केला लालपरीतून मोफत प्रवास

राज्यातील ३१ विभागांमध्ये ५२ दिवसांतच प्रतिसाद
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

मालेगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त (75th Indipendent day of India) राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शिंदे-फडणवीस (Eknath Shinde & Devendra Fadanvis) सरकारने २६ ऑगस्टपासून एसटी बसमध्ये राज्यात (Maharashtra) सर्वत्र मोफत प्रवास योजना सुरू केली आहे. शासनाचा निर्णय व लालपरीतील या प्रवासाला ज्येष्ठांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. (senior citizen obove 75 years taken benifit of free St Travel scheme)

Dada Bhuse
उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करा, म्हणणाऱ्या गौरी भिडेंच्या जीवाला धोका : राणेंचा गंभीर आरोप!

राज्यातील ३१ विभागांतून केवळ ५२ दिवसांतच एक कोटी चार लाख ८६ हजार ८०९ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला. राज्यात रोज सरासरी दोन लाखांवर नागरिक ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ या योजनेचा प्रवास करून फायदा घेत आहेत. विरोधक व सोशल मीडियावर ट्रोल होणारी ही योजना ज्येष्ठांनी यशस्वी करून दाखविली आहे.

Dada Bhuse
कारवाई टाळण्यासाठी शिक्षकाकडे लाच मागणारा मुख्याध्यापक अडकला जाळ्यात

योजनेमुळे ज्येष्ठांना दिवाळीत कुटुंबासह गावी, पर्यटन स्थळे, देवदर्शन यांसह नातेवाइकांकडे विविध ठिकाणी फिरायला जाण्यास मिळत आहे. यंदाच्या दिवाळीत हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ ऑगस्टला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ ही योजना जाहीर केली.यामुळे राज्यात २६ ऑगस्टपासून लालपरीतून ज्येष्ठांना मोफत प्रवास लाभ मिळू लागला. राज्यात एसटी महामंडळाच्या १५ हजार ५०० बस रोज शहरासह ग्रामीण भागात धावतात. २४७ आगार व ५७८ बसस्थानके आहेत. या बसमध्ये ३० विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात ३३ टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते.

राज्यातील २९ लाख प्रवासी रोज एसटी बसमधून प्रवास करतात. त्यात दोन लाख ७५ वर्षांवरील ज्येष्ठांचा समावेश आहे. एसटी बस ही ज्येष्ठ नागरिक, शाळेतील मुले व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवास करण्याचे हक्काचे वाहन आहे. या योजनेमुळे ज्येष्ठांना पुणे, मुंबई, नागपूरसह मोठ्या शहरात दवाखाना व इतर कामांसाठी जाणे सोपे झाले आहे.

योजना ठरली वरदान

‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ ही योजना ज्येष्ठांना वरदान ठरली आहे. एसटी बसच्या राज्यातील २६ ऑगस्ट ते १६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जालना, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, गडचिरोली या ३१ विभागांतून तब्बल ५२ दिवसांतच एक कोटी चार लाख ८६ हजार ८०९ ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत मोफत प्रवास केला आहे. या योजनेमुळे वृद्धांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त अशी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना जाहीर केली आहे. योजनेमुळे कुटुंबातील वृद्ध माता-पिता, आजी-आजोबांना पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी देता येत आहे. नातेवाईक, आप्तेष्ट व नातवंडांच्या भेटी होत आहेत.

- दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com